Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी, आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार
Maharashtra Budget Session : आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. काल (23 मार्च) हा प्रस्ताव सादर होऊ न शकल्याने आज सादर केला जाणार आहे.
![Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी, आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार Maharashtra Budget Session 2023 opposition party leaders will become aggressive on law and order farmers issues Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस बाकी, आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/24/15cac9b220e62bb5872a15273cc71fc51679616814036339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Budget Session : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) शेवटचा आठवडा सुरु आहे. उद्या (25 मार्च) अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान, आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. काल (23 मार्च) हा प्रस्ताव सादर होऊ न शकल्याने आज सादर केला जाणार आहे. या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा केली जाणार आहे. यावेळी आज विरोधकांकडून गंभीर आरोप केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या अधिवेशनात विरोधकांनी शेती प्रश्नासह विविध मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केली नाही. यावरुन देखील विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच वाढती महागाई, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज्याच्या अनेक ठिकाणी झालेल्या हिंसेच्या घटना, बलात्काराच्या घटना, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरत विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. तसेच आज विधान परिषदेमध्येही अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
विरोधक-सत्ताधारी आमने सामने
कालही विरोधक आक्रमक झाले होते. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळालं. राहुल गांधींच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. तर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी राहुल गांधींच्या फोटोला चप्पल मारल्याचे पाहायला मिळाले. परदेशात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी करत आहेत. काल विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
27 फेब्रुवारीपासून अधिवेशनाला झाली होती सुरुवात
27 फेब्रुवारीपासून राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून विरोधकांनी विविध मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. अनेकवेळा गदारोळामुळं सभागृह तहकूब करण्याची वेळ देखील आली. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत दररोज विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. आजही विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra Budget Session : उद्धव ठाकरे-दिपक केसरकर एकत्र; मराठी भाषा भवनच्या बैठकीत ठाकरेंच्या सूचना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)