One Crore For 10 Schools: महापुरुषांच्या गावांतील 10 शाळांना प्रत्येकी 1 कोटींचा निधी, त्या दहा शाळा कोणत्या?
Ajit Pawar Announcement about School : अजित पवारांनी आज महापुरुषांच्या संबंधित गावांमधील शाळांसदर्भात मोठी घोषणा केलीय. महापुरुषांशी संबंधित गावांतील 10 शाळांना एक कोटींचा निधी दिला जाणार आहे.
Ajit Pawar Announcement about School : विधानसभेत आज (Maharashtra Vidhan Sabha) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यात त्यांनी शिक्षण क्षेत्रासंबंधी विविध घोषणा केल्या. उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे तर शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे. यात महत्वाची एक घोषणा केली ती म्हणजे महापुरुषांशी संबंधित गावांतील 10 शाळांना देत असलेल्या निधिबाबत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील महापुरुषांशी संबंधित गावांतील 10 शाळांची निवड करण्यात आली आहे, या शाळांना शैक्षणिक सुविधांच्या सुधारणांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवारांनी आज केली.
या दहा शाळा कोणत्या...
1. महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे
2. राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मगांव कागल, जि. कोल्हापूर
3. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेली पहिली शाळा, सातारा
4. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली.
5. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव- मुरुड, जि. रत्नागिरी.
6. साने गुरुजी यांचे जन्मगाव पालगड, ता. दापोली, जि रत्नागिरी.
7. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा
8. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव मोझरी, ता. तिवसा, जि. अमरावती
9. संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव शेंडगांव, ता. अंजनगांव सुर्जी, जि अमरावती.
10. क्रांतीसिंह नाना पाटील यांचे मूळगाव येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली.
संबंधित बातम्या
Maharashtra Budget : कर्जमाफी, अनुदानात वाढ; महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?
Maharashtra Budget 2022 : शिवरायांना वंदन करुन अजितदादांनी मांडला अर्थसंकल्प; छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी