Maharashtra Budget 2024 : आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, अर्थमंत्र्यांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
Budget Session 2024 : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
Budget Session 2024 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session 2024) आज दुसरा दिवस असून अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2024) मांडला. विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election) अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असल्याने या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवारांनी केली आहे. याअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
'बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल', हा अभंग म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 सालचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली. त्यांनी पहिली महत्वाची घोषणा वारकर्यांसाठी केली. प्रती दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देणार आहे. देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केली जाणार आहे. वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे अक्षरशः बेजार झाले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेल, CNG तसेच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सिलेंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षणाला ही योजना सहाय्यभूत ठरेल. 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले.
राज्य सरकार 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवणार
तसेच, राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील. नवीन रुग्नवाहिका खरेदी केल्या जातील. बचत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार रुपयांची वाढ केली जाईल. यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे. मत्स्य बाजार स्थापना केले जाणार आहे. बांबूची लागवड केली जाणार आहे. प्रती रोपाकरता 175 रुपये अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतला जाणार, अशा घोषणा देखील अजित पवारांनी केल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या