Maharashtra Breaking News Live Updates : राज्य, देश, जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : सध्या राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकीय वर्तुळात तर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच संघर्ष चालू आहे. बी़डमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळे या खऊन प्रकरणात आणखी मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारतर्फे लवकरच पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्याचं पालकत्त्व कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रमुख तसेच राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
बीडचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांचे शेकडो समर्थक दाखल
बीडचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांचे शेकडो समर्थक दाखल
अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी देखील आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी
बीड जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
1) पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची केज पोलीस स्टेशन ते नियंत्रण कक्ष अशी विनंतीवरून
2) पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची केज पोलीस स्टेशन प्रभारी
3) पोलीस निरीक्षक सय्यद मजहरअली अबुतालीब यांची नियंत्रण कक्ष ते परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी
4) पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची नियंत्रण कक्ष ते केज पोलीस स्टेशन अशी बदली करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांची बदनामी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
अपहरणाचा बनाव करून पायाला साखळ दंड बांधून थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांची बदनामी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
अपहरणाचा बनाव करून मंत्री पंकजा मुंडे यांची बदनामी केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर इंगळे या व्यक्ती विरोधात भाजपाचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक जानेवारी रोजी ज्ञानेश्वरी इंगळे पायाला साखर दंड बांधलेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात आला होता त्यामुळे याची चर्चा रंगली होती.
व्यवसायातील भागीदाराने अपहरण करून जवळील पैसे लुटण्याचा बनाव ज्ञानेश्वर इंगळे याने केला होता. यादरम्यान पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबत वक्तव्य करीत त्यांची बदनामी करून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा बातम्या प्रसारित केल्या.. यावरूनच हा गुन्हा दाखल झाला आहे.
दत्ता तांदळे आणि ज्ञानेश्वर इंगळे हे व्यावसायिक भागीदार आहेत. व्यवसाय वाढीसाठी वीस लाख रुपयांचे पत्र पंकजा मुंडे यांच्याकडून आणण्यासाठी दहा टक्क्याने दोन लाख रुपये द्यायचे आहेत. असे सांगून हे मुंबईला निघाले होते. याच दरम्यान इंगळे याने अपहरणाचा बनाव केला होता.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेले बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश
नाशिक ब्रेकिंग...
- नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेले बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश
- जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेलं बाळ अवघ्या काही तासात आईच्या कुशीत
- स्वतःला बाळ होत नसल्याने बाळ चोरल्याची धक्कादायक माहिती समोर
- सपना मराठे वय 35 राहणार धुळे या महिलेने बाळ चोरल्याची माहिती समोर
- बाळ चोरी करून सदर बाळ दिंडोरीत आपल्या आई वडिलांच्या ताब्यात देऊन सदर महिला झाली होती फरार
- गेल्या 8 दिवसांपासून सदर महिला बाळ चोरण्याच्या उद्देशाने जिल्हा रुग्णालय परिसरात करत होती रेकी
कोयना धरण परीसरात भूकंपाचा सौम्य धक्का, सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचा धक्का
ब्रेकिंग
कोयना धरण परीसरात भूकंपाचा सौम्य धक्का
सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचा धक्का
कोयना धरणाच्या पूर्वेकडील परीसरात केंद्रबिंदू
भूकंपाची तिव्रता 2 रिक्टर स्केल असण्याची शक्यता.