Maharashtra Breaking News LIVE Updates : अजित पवारांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे दाखल
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..
LIVE
Background
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. नागपुरात हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. महायुती सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर विरोधक बोट ठेवत आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र तसेच देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. शाहांच्या या विधानाचे पडसाद विधिमंडळातही उमटताना दिसतायत. राज्यात संपूर्ण जिल्ह्यांत पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
कुलाबा निलकमल बोट अपघात प्रकरणात ७ वर्षाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला
कुलाबा निलकमल बोट अपघात प्रकरणात ७ वर्षाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला
मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांची संख्या १५ वर पोहचली आहे
जोहान निसार अहमद असे या मृत मुलाचे नाव आहे
माजी पंतप्रधान एच डी देवगौडा आणि केंद्रीय मंत्री कुमारस्वामी नाशिकमधे पोहोचले
माजी पंतप्रधान एच डी देवगौडा आणि केंद्रीय मंत्री कुमारस्वामी नाशिकमधे पोहचले आहेत,
12 वाजेपर्यंत नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत
दर्शनानंतर माध्यमांशी बोलतील
दुपारी त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी जाणार आहेत
मुंबईतील निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक
मुंबईतील निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत निरीक्षकांची बैठक...
विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतील विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी 36 विधानसभा मतदारसंघत निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती
यानुसार 227 वार्डचा आढावा निरीक्षकांनी घेतला असून आज अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे निरीक्षकांकडून सोपवला जाणार आहे...
विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुनील राऊत, अमोल कीर्तिकर यासह अनेकांचा समावेश यामध्ये केला होता
विधानसभेतील पराभवानंतर महानगरपालिकेच्या तयारीसाठी आणि आढाव्यासाठी या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती
त्यानुसार निरीक्षकांनी 36 विधानसभा निहाय वॉर्डची आणि शाखांची भेट देऊन पदाधिकाऱ्यांची बातचीत केली आहे
त्यानंतर त्याचा अहवाल आज उद्धव ठाकरेंकडे सोपवला जाणार आहे
विधानसभेतील पराभवानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असं अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे
त्यानुसार त्यांनी निरीक्षकांकडे आपलं म्हणणं सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती
मिरा भाईंदर परिसरात बांगलादेशी, रोहिगे यांची अनधिकृत वसाहत: पोलिसांकडे मनसेची कारवाईची मागणी
मिरा भाईंदर परिसरात बांगलादेशी, रोहिगे यांची अनधिकृत वसाहत: पोलिसांकडे मनसेची कारवाईची मागणी
मिरा भाईंदर: मिरा भाईंदर परिसरातील कनकिया परिसर, नेमिनाथ टॉवर, एव्हरशाईन बिल्डिंग आदी ठिकाणी बांगलादेशी आणि रोहिगे नागरिकांनी अनधिकृतपणे वास्तव्य केल्याची तक्रार मिरा भाईंदर मनसेने केली आहे.
या व्यक्तींचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे खोटी असल्याचा संशय असून, त्यांच्या परदेशी नागरिकत्वाचा पुरावा पोलिस ठाण्यात जमा झालेला नसल्याचा , आरोप मनसेने केला आहे.
मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी याबाबत पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त यांना पत्र लिहून, सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या व्यक्तींना स्थानिक प्रशासनाकडून पाठींबा मिळत असल्याचाही आरोप मनसेने केला असून, त्यांच्या अनधिकृत वसाहतींमुळे भविष्यात सुरक्षेचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा मनसेने दिला आहे.
दोन्ही सभागृहाचे आज कामकाज संपल्यानंतर सर्वपक्षीय आमदारांसाठी चहापानाचे आयोजन
दोन्ही सभागृहाचे आज कामकाज संपल्यानंतर सर्वपक्षीय आमदारांसाठी चहापानाचे आयोजन
विधानभवनातील परिसरात आयोजन करण्यात येणार