Maharashtra Breaking LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोट बुडाली, तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेनं निघालेली निलकमल ही प्रवासी बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 10 प्रवासी आणि 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. समुद्रातून प्रवास सुरू असताना नीलकमल बोटीला भारतीय नौदलाच्या स्पीड बोडची जोरदार धडक बसली. नौदलाच्या ज्या बोटीनं धडक दिली त्या बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू होती अशी प्राथमिक माहिती मिळतेय. इंजिनात बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला की आणखी काही इतर कारण आहे हे चौकशीनंतर समोर येईल.
नागपुरातील रेशीमबागेत आज महायुतीच्या बौद्धिक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृतीमंदिरात महायुतीच्या आमदारांचं आज बौद्धिक आयोजित केलं आहे. दरम्यान या बौद्धिकाला महायुतीचे घटकपक्ष असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या आमदारांना सकाळी 8 वाजता संघ कार्यालयात निमंत्रित केले आहे. मात्र यावेळी तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार तेथे जाणार की टाळणार, याकडे लक्ष लागले आहे.
विधानसभेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक
राज्य सरकारनं काल विधानसभेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मांडले आहे. नक्षली धोका आता केवळ दुर्गम भागापुरता मर्यादीत नाही, शहरी नक्षल अड्डे बंद करण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शहरी नक्षलवादाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी या विधेयकामध्ये खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर नक्षलवाद विरोधी कायदा असताना नवा कायदा कशासाठी असा सवाल काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केला.
Nashik News : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांची दहशत, परिसरातील सीसीटीव्ही फोडले
Nashik Crime News : नाशिकच्या सिडको परिसरातील महाकालीचौकात अल्पवयीन मुलांची दहशत पाहायला मिळत आहे.
अल्पवयीन मुलांनी दगडांनी परिसरातील सीसीटीव्ही फोडले.
त्याचबरोबर परिसरातील स्ट्रीट लाईटवरही दगड फेकले.
संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
Mumbai Boat Accident Update : मुंबईच्या बोट दुर्घटनेत नाशिकच्या आहेर दाम्पत्यांसह चिमुकल्याचा मुत्यू
Mumbai Boat Accident Nashik Death : मुंबईच्या बोट दुर्घटनेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांवच्या आहेर दाम्पत्यांसह चिमुकल्याचा मुत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दम्याच्या आजारावर उपचारासाठी पिंपळगांवच्या राकेश नाना आहेर हे दोन दिवसापूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबई येथे गेले होते.पण बोट दुर्घेटनेत काळाचा घाला आहेर कुटुंबियांचा बळी घेऊन गेला. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन ते सायंकाळी मुबंईच्या गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटला दिलेल्या दुर्देवी अपघातात आहेर कुटुंबातील तिघांचा श्वास थांबला. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेने पिंपळगांव बसवंतच्या आहेर कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला.
Beed Crime News : बीडमधील गोळीबार प्रकरणात एकूण 3 आरोपींना अटक
Beed Firing Case : बीडमधील गोळीबार प्रकरणात एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर या दोघांना पुणे लोहगाव भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही अवैधरित्या शस्त्र बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या आरोपीवर आहे. बीडमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना सिनेस्टाईल अटक केली असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. ओमकार सवई याला बीडमधून अटक केली आहे.
Maharashtra Politics : खातेवाटप आज जाहीर होणार का? याची राज्याला उत्सुकता; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची यादी तयार
Maharashtra Politics : खातेवाटप आज जाहीर होणार का याची राज्याला उत्सुकता
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची यादी तयार
खातेवाटपाची यादी आज राज्यपालांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती
मुख्यमंत्री आज सकाळी यादी पाठवणार असल्याची शक्यता
Maharashtra Adhiveshan: विधिमंडळ अधिवेशनात आज परभणी आणि बीडच्या मुद्द्यावर चर्चा
Maharashtra Adhiveshan : विधिमंडळ अधिवेशनात आज परभणी आणि बीडच्या मुद्द्यावर चर्चा
आज सकाळी साडेनऊ ते साडेदहा दरम्यान विधानसभेत विशेष बैठक
विधानसभेत विशेष बैठकीत परभणी, बीडसंदर्भात चर्चा
मुख्यमंत्री मोठी घोषणा कोणती करणार याची उत्सुकता
परभणी, बीडसंदर्भात विरोधकांनी दिला होता स्थगन प्रस्ताव
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चाही पूर्ण, मुख्यमंत्र्यांचं उत्तर आज