Nagpur winter assembly session 2024 : Nagpur winter assembly session 2024 : खाते वाटपासाठी आजच सायंकाळी बैठकीची शक्यता
Maharashtra Breaking News 16th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
Maharashtra Breaking News 16th December 2024 Live Updates: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांसाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे यादी मुंबईतील पावसाळी अधिवेशन असो की यापूर्वी पार पडलेला हिवाळी अधिवेशन असो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आलं नव्हतं. यंदा मात्र पहिल्यांदा ही स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेली आहेत. पक्ष फुटी नंतर पहिल्यांदाच विधिमंडळात दोन पक्षांची विविध कार्यालय पाहायला मिळत आहे. देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
Nagpur winter assembly session 2024 : खाते वाटपासाठी आजच सायंकाळी बैठकीची शक्यता
ब्रेकिंग
खाते वाटपासाठी आजच सायंकाळी बैठकीची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी होणार बैठक
विश्वसनीय सूत्रांची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही उपस्थित राहण्याची शक्यता
खातेवाटपासंदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता
मला आदिवासी विकास मंत्री पद मिळाला तर आदिवासी आणि इतरांसाठी मी चांगलं काम करेल - नरहरी झरवाळ
नरहरी झिरवाळ
मला आदिवासी विकास मंत्री पद मिळाला तर आदिवासी आणि इतरांसाठी मी चांगलं काम करेल
छगन भुजबळ यांच्या नाराजी बद्दल मला माहिती नाही
छगन भुजबळ वरिष्ठ नेते आहेत आणि जर त्यांना डावलला असेल तर अर्थात ज्येष्ठ नेते नाराज होतात
पण त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अजित पवार करतील
मी सुद्धा त्यांना भेटणार आहे
पक्षाच्या बैठकीमध्ये कोणाला मंत्रिपद द्यायचा याबाबत चर्चा वरिष्ठ पातळीवर झाली होती मला त्याच्याबद्दल माहित नाही
जयगड वाळूगळती अपडेट, वायुगळतीनंतर त्रास होऊ लागल्यामुळे जयगडमधील 12 मुलांना पुन्हा उपचारसाठी पाठवले
रत्नागिरी, जयगड वाळूगळती अपडेट
वायुगळतीनंतर त्रास होऊ लागल्यामुळे जयगडमधील 12 मुलांना पुन्हा उपचारसाठी रत्नागिरीमध्ये दाखल
रत्नागिरीमधील एका खासगी रुग्णालयात उपचारसाठी केले दाखल
चक्कर येणे, मळमळणे आणि उलटीचा त्रास होत असल्याचे बाधित मुलांचं म्हणणं
काही विद्यार्थी गुरुवारी, शुक्रवारी तर काही रविवारी रात्री आले उपचारासाठी
मुलांचा घेतला जात आहे जबाब
Nagpur winter assembly session 2024 : थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकसाठी रवाना होणार
थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकसाठी रवाना होणार
मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा
आज पहिल्या सभागृहात हजेरी लावली मात्र उद्यापासून भुजबळ मतदार संघात असणार
समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन भुजबळ भेटणार
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया
धाराशिव ब्रेकिंग
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया
डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याची त्यांचे चिरंजीव आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची माहिती
गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणास्तव डॉक्टर पद्मसिंह पाटील मुंबईतच
डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून पाटील पुढील दोन ते तीन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी राणा पाटील यांची माहिती