Maharashtra Breaking News LIVE: वाल्मीक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई अन् दुसऱ्या दिवशीही परळी बंद!
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी (Torres Scam) अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरुवात केली, असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच राज्यात थंडीच्या कडाका वाढणार असून पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
परभणीतील 'त्या' हातगाड्याला लावली दोघांनी आग; धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर
Parbhani: परभणी शहरातील वसमत रस्त्यावर असलेल्या एका वडापावच्या हातगाड्याला आग लागून गाड्यामधील 2 सिलेंडरचा स्फोट होवून शहर हादरले होते. मात्र या घटनेतील सीसीटीव्ही समोर आले असून 2 तरुणांनी या गाड्यात ज्वलनशील पदार्थ टाकुन आग लावण्यात आली होती. ज्यामुळे गाड्याने पुर्णतः पेट घेवुन गड्यातील दोन सिलेंडरचा स्फोट झाला होता. या प्रकरणात आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोन तरुण कोण आहेत? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान अशा प्रकारे आग लावण्याची परभणीतील ही पहिलीच गंभीर घटना आहे.
Pooja Khedkar: पूजा खेडकरला दिलासा
पूजा खेडकरला अंतरिम दिलासा. १४ फेब्रुवारीला पुढील सुनावणी. पुढील सुनावणीपर्यंत अटक होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी झाली. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला
Walmik Karad: वाल्मिक कराडच्या अलिशान फ्लॅटचा लिलाव होणार
सविस्तर बातमी वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा...
Santosh Dehsmukh case: संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, 'ती' स्विफ्ट कार कोणाची?
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. याप्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) वाल्मिक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी असलेल्या मकोका कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना घरात आसरा देणाऱ्या लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
रुग्णालयातून बाहेर आले; पोलीस व्हॅनमध्ये बसण्याआधी वाल्मिक कराडने 'रोहित कुठंय' विचारले
सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा...