एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 45 जणांच्या नावांची घोषणा
Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक नेते पक्षबदल करत आहेत. तिकीट मिळण्याची शक्यता लक्षात घेता, नेतेमंडळी हा निर्णय घेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi)आणि महायुती (Mahayuti) यांच्यातील जागावाटपाचे त्रांगडे अद्याप मिटलेले नाही. संपूर्ण जागावाटप झालेले नसले तरीही भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाने एकूण 99 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासा सुरुवात होणार आहे. येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. सकाळी 11 ते 3 ही अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे. त्यामुळे आजदेखील राज्याच्या राजकीय पटलावर मोठ्या घाडमोडी घडणार आहेत.
MVA : बाळासाहेब थोरातांच्या शिष्टाईला यश,मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला
बाळासाहेब थोरातांच्या शिष्टाईला यश
मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला
काँग्रेस- 105 जागा
ठाकरे गट जागा 95
शरद पवार 84 जागा
उद्या पत्रकार परिषदेत होणार घोषणा
MNS List : मनसेकडून पहिली उमेदवार यादी जाहीर, अमित ठाकरे रिंगणात, रमेश वांजळेंच्या मुलाला उमेदवारी
मनसेकडून पहिली उमेदवार यादी जाहीर,
अमित ठाकरे माहीममधून रिंगणात,
रमेश वांजळेंच्या मुलाला उमेदवारी
संदीप देशपांडे वरळीतून रिंगणात























