Maharashtra Breaking 5th Saptember LIVE : देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. या घटनांसह राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
Sindhudurg News: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सिंधुदुर्गला मोठा फटका, 65 टक्के बसेस रद्द, 14 लाखांहून अधिक उत्पन्न बुडाले.
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुमारे 65 टक्क्यांहून अधिक बसफेऱ्या बंद राहिल्या. त्यामुळे गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना आणि खरेदीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या गणेश भक्ताचे मोठे हाल झाले. काल रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे सुमारे नऊ लाख 37 हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. तर मंगळवारी रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे साडेचार लाखांहून अधिक उत्पन्न बुडाले होते.
Hingoli News : आदित्य ठाकरे यांचा शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉल वरून संवाद
Hingoli News : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे काल हे काल मराठवाडा दौऱ्यावर होते पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी आदित्य ठाकरे करत असताना रात्री त्यांना हिंगोलीकडे येण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे त्यांचा हा दौरा झाला तरी मात्र आदित्य ठाकरे यांनी उपस्थित झालेल्या शेतकऱ्यांसोबत व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला आहे. जिल्ह्यातील डोंगरगाव पूल येथील अनेक शेतकऱ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी व्हिडीओ कॉल वरून संवाद साधला आहे. झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आम्हीं तुमच्या सोबत आहोत काळजी करू नका, तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचा यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितला आहे.
Gondia News : मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूडलावर पडल्या भेगा; दोन महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला पूल
Gondia News : मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर कोहमारा ते देवरी पर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा जंगल परिसर असल्याने वन्य प्राण्यांना आगमन करण्याकरिता उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. नयनपुर जवळील एक पूल वाहतुकीसाठी दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आला होता. मात्र त्यावर मोठे भगदाड पडल्याने आठवड्याभरातच पुल बंद करण्याची वेळ संबंधित कंपनीवर आली होती. मात्र आता पुन्हा दोन महिन्यानंतर मोठ्या भेगा पडल्याने पुन्हा एकदा हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. दोन महिन्यातच पुलावर भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Beed News : पहाडी पारगाव येथील जिल्हा परिषद शाळा कोसळली
Beed News : धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव येथील जिल्हा परिषद शाळा कोसळली असून रात्री घटना घडल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
Maharashtra News : मालवण पुतळा दुर्घटनेतील माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला : दीपक केसरकर
Maharashtra News : मालवण पुतळा दुर्घटनेतील माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. एखाद्या वाक्य दाखवताना ते पूर्णपणे दाखवणे गरजेचे आहे. पुतळा दुर्घटनेच्या त्या घटने बाबत मी बोललो. त्यामुळे माझ्या भावना समजून घेणे गरजेचे होते. आजही मी ठामपणे सांगतो महाराष्ट्र सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजां भव्य दिव्य पुतळा उभा करण्यात येणार आहे. सगळ्यात मोठे चित्रकार यांच्याशी आमचे बोलणे झाले असून ते या पुतळ्याचे डिझाईन करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत भव्य दिव्य स्मारक राजकोट येथे होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले आरभारी राजा होते. या गोष्टीमुळे या ठिकाणी शिवाजी महाराजांची स्मृती आणि इतिहास टिकून राहण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. जे पडेल ते अत्यंत वाईट होत.जयंत पाटील आले आणी माझ्यावर टीका करून गेलेही.