एक्स्प्लोर

Kolhapur : गावावरुन परतली, वडिलांना फोनही केला अन् पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला; शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहातील मुलीची आत्महत्या

Shivaji University Hostel Girl Suicide : शिवाजी विद्यापीठात भूगोल विभागात शिकणाऱ्या सांगलीच्या मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गायत्री रेळेकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव असून ती मूळची सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील आहे. या विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

गायत्री रेळेकर ही विद्यार्थिनी भूगोल विभागात पहिल्या वर्षात शिकत होती. गावावरुन परतल्यानंतर गायत्रीने हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर शिवाजी विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईक तसेच गायत्रीच्या मैत्रिणींचा वसतिगृहासमोरचा आक्रोश हा हदय पिळवटून टाकणारा होता.

गावावरुन परतल्यानंतर टोकाचं पाऊल

गायत्री रेळेकर ही विद्यापीठातीली मुलींच्या वसतिगृहातील रुम नंबर 54 मध्ये राहत होती. तिच्यासोबत इतर दोन मुलीही राहत होत्या. गायत्री ही तीन दिवस तिच्या गावी गेली होती. 11 ऑगस्ट रोजी सकाळी ती सांगलीवरून कोल्हापूरमध्ये पोहोचली. तसा फोन तिने तिच्या वडिलांना केला. त्यानंतर तीन विद्यापीठातील वसतिगृहामध्ये पोहोचली.

पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवलं

दुपारच्या सुमारास गायत्रीच्या मैत्रिणी वसतिगृहामध्ये पोहोचल्या. त्यावेळी गायत्रीच्या रुमचा दरवाजा आतून बंद होता. त्या मैत्रिणींनी दरवाजा ठोठावला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. फोन केल्यानंतर रिंग वाजत होती, पण तो उचलला नाही. त्यावर शंका आल्याने त्या मैत्रिणींनी खिडकीतून डोकावल्यानंतर त्यांना धक्काच बसला. रुमच्या आतमध्ये गायत्रीने आपल्या ओढणीने गळफास लावून घेतला होता.

दरवाजा तोडून सुरक्षारक्षकांनी आत प्रवेश केला

या घटनेची माहिती त्या मैत्रिणींनी तात्काळ हॉलस्टेल्या रेक्टर आणि सुरक्षारक्षकांना दिली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. नंतर या घटनेची माहिती राजारामपुरी पोलीस स्टेशनला कळवण्यात आली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ विद्यापीठात पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या विद्यार्थिनीने आत्महत्या नेमकी का केली, त्यामागे कोणतं कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

हॉस्टेलच्या मुलींमध्ये भीतीचं वातावरण

गायत्री ही विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेल नंबर 1 मध्ये रहायला होती. आपल्या गावी जाऊन आल्यानंतर तीने आत्महत्या केली. गायत्रीच्या आत्महत्येनंतर या वसतीगृहातील मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget