Maharashtra Breaking News LIVE Updates : काळजीवाहू मुख्यमंत्री आजारी, पांढऱ्या पेशी वाढल्या, ज्युपिटरमध्ये तपासणीसाठी दाखल
Maharashtra Breaking News LIVE Updates : देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. त्यासोबतच साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. तर दुसरीकडे राज्याचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नानं सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन खलबतं सुरू आहेत. सध्या एकनाथ शिंदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा कधी सुटणार? महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? याकडे राज्यच काय, तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
सर्व घडामोडींचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News : ज्युपिटर रुग्णालयातून निघाल्यावर एकनाथ शिंदे वर्षा बंगल्याच्या दिशेनं रवाना
Maharashtra News : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असून त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती मिळत आहे. काही वेळापूर्वीच ज्युपिटर रुग्णालयात जाऊन तपासणी केल्यानंतर आता वर्षा निवासस्थानाच्या दिशेनं रवाना होत असल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra News : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना ताप, अशक्तपणा; उपचार सुरू
Maharashtra News : एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नाही,
डेंग्यू आणि मलेरिया यांची चाचणी केली असता निगेटिव्ह आली आहे,
मात्र पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूच
सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक सुरू आहेत,
त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात अशक्त पणा आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे,
हळूहळू तब्येतीत सुधारणा होत असल्याचे देखील डॉक्टरांचे म्हणणे...
जुपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत
सूत्रांची माहिती.
























