Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) विजेता ठरला असून महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध माहिती समोर येत आहे.

Background
Maharashtra Breaking News Live Updates: अहिल्यानगर येथे 67 वी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) कुस्ती स्पर्धा काल (2 फेब्रुवारी) पार पडली. या कुस्ती स्पर्धेमध्ये पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) विजेता ठरला असून महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला आहे. पृथ्वीराज मोहोळ सोलापूर येथील महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याच्याशी महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. याआधीच्या सामन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ पाहायला मिळाला. पैलवान शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारल्याने वाद निर्माला झाला आहे. तसेच बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
भंडाऱ्यात स्कूल व्हॅनमध्ये चालकानं केली 10 वर्षीय विद्यार्थिनीची छेडखानी; गुन्हा दाखल
भंडारा: शहरातील एका स्कूलमध्ये शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीची त्याचं शाळेत मुलं सोडणाऱ्या प्रायव्हेट स्कूल व्हॅन चालकानं विनयभंग केला. ही घटना 1 फेब्रुवारीला घडली असून आज पालकांनी भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून ही घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होताचं चालक फरार झाला आहे. सुभाष फत्तु नेवारे (३५) असं चालकाचं नावं आहे. सुभाष हा प्रायव्हेट स्कूल व्हॅन चालक असून त्याच्या व्हॅनमध्ये पीडिता आणि तिचा लहान भाऊ दोघेही स्कूलमध्ये जातात. शनिवारी सकाळ पाळीची शाळा झाल्यानंतर दोन्ही बहीण भावाला व्हॅननं घराकडं सोडून देताना चालकानं पीडितेचा विनगभंग केला होता.
जिल्हा नियोजन समितीच्या सभेत शासकीय कर्मचाऱ्यांना सभेचे गंभीर्यच नाही, अधिकारी मोबाईलवर
सिंधुदुर्ग: जिल्हा नियोजन सभेचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुरु. या सभेला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार निरंजन डावखारे यांच्या सह शासकीय अधिकारी उपस्थित. मात्र या सभेला उपस्थित असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना या सभेचे सोयरं सुतक नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. या बैठकीतील विविध खात्याचे अधिकारी चक्क मोबाईल, सोशल मीडियावर व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. तर काही अधिकारी मोबाईल वर संभाषण करत असल्याचे पहायला मिळाले. जिल्हा नियोजन सभेला अशा पद्धतीने अधिकारी दुर्लक्ष होणार असेल तर नियोजन चा घाट नेमका कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय.























