Maharashtra Breaking 29th June LIVE Updates: अजित पवारांना मोठा धक्का; अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणा, सुत्रांची माहिती
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. मुंबई,ठाणे,नवी मुंबई महापालिका क्षेत्रात डिझेल 2 रुपयांनी तर पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त होणार. आजपासून नवे दर लागू
2. अर्थसंकल्प म्हणजे थापांचा महापूर आणि आश्वासनांची अतिवृष्टी, उद्धव ठाकरेंची टीका, तर भूलथापांचा नाही मायबापांचा अर्थसंकल्प, फडणवीसांचं प्रत्युत्तर
3. अर्थसंकल्प म्हणजे लोकसभा पराभवाचं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, जयंत पाटलांची टीका, तर राज्यात नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प, फडणवीसांचं प्रत्युत्तर
4. निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वीज बिल माफीची भेट, साडे सात हॉर्सपॉवरपर्यंतच्या 46 लाख कृषी पंपांची वीज बिलं माफ
5. मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत, 8 लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना लाभ, मेडिकल,इंजिनियरिंग,कृषी अभ्यासक्रम मोफत शिकता येणार
6. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा, 21 ते 60 वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार, येत्या 1 तारखेपासून अंमलबजावणी
7. महाराष्ट्रात ड्रग्ज घेणारे, विकणारे कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा, संपूर्ण राज्यात बुलडोझर, जेसीबी लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही
8. पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप..रेट कार्ड वाचून दाखवत विरोधीपक्षनेते वडेट्टीवारांचा गृहखात्यावर निशाणा
Kolhapur News: अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील शरद पवार यांच्या भेटीला
Kolhapur News: अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांच्या दोन दौऱ्यात ए. वाय पाटील यांचा सहभाग होता. ए. वाय. पाटील शरद पवार यांच्यासोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझानं सर्वात आधी दाखवली होती, ए वाय पाटील हे शरद पवार यांच्यासोबत जाण्याची बातमी.
Ashadhi Ekadashi: रायगडात वारकऱ्यांचा दिंडी सोहळ्याचा उत्साह.
Ashadhi Ekadashi: पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनसाठी आज रायगडमधील श्रीवर्धन हरिहरेश्वर भरडखोल मधुन पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं अनेक वारकरी या दिंडीत सहभागी होऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करू लागलेत गेल्या 47 वर्षांची परंपरा जपत आलेल्या या वारकऱ्यांचा वेगळाच उत्साह पहायला मिळतोय. महाड भोर पुणे मार्गे हे वारकरी पंढरपूर च्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान उद्योगपती प्रीतेश बाबेल यांच्या कडून दिंडीच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या वेळी दीडीकराना अल्पोहरची व्यवस्था आणि मेडीसिनच्या किट देखील सोबत देण्यात आल्या.
























