Maharashtra Breaking 27th June LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी...
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण १३ दिवस चालणार कामकाज,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल होणार सादर.
2. महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं शेवटचं अधिवेशन असणार,त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत.
3. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित.
4. राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर बहिष्कार.
5. विरोधकांनी प्रथेप्रमाणं चहापानावर बहिष्कार टाकला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला, पाठ्यपुस्तकात खोटं बोल पण रेटून बोल हा विरोधकांचा पवित्रा, फडणवीसांची टीका.
Naresh Mhaske on Future CM : महाविकास आघाडीनं राज्यात अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावा : नरेश म्हस्के
Naresh Mhaske on Future CM : महाविकास आघाडीनं राज्यात अबू आझमी यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावा,
तसाही त्यांनी निवडणुकीत झेंड्याचा रंग बदललेला आहे. हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षाचा घरात बसून केलेला कारभार आणि अडीच वर्ष पायाला भिंगरी बांधून एकनाथ शिंदे यांनी केलेला कारभार याच मूल्यमापन करावं लागेल, असं नरेश म्हस्के म्हणाले.
नरेश म्हस्के म्हणाले की, आमच्या नेत्यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे, आमचा (महायुतीचा) राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील.
Mumbai News : मुंबईच्या अंधेरी पूर्वेत अंधेरी-कुर्ला रोडवर मोठी वाहतूक कोंडी
Mumbai News : मुंबईच्या अंधेरी पूर्वेत अंधेरी-कुर्ला रोडवर मोठी वाहतूक कोंडी. अंधेरी कुर्ला रोडवर अंधेरी ते साकीनाकाच्या दिशेने जाणारा मार्गावर मागील एक तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अंधेरी कुर्ला रोडवर चकाला,जे.बी नगर,मरोळ पाईप लाईन,मरोळ नाका दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मागील एक तासापासून या वाहतूक कोंडीच्या सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहना रस्त्यावर उतरल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याचा माहिती वाहतूक पोलिसांकडून मिळत आहे.























