एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Breaking 27th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra Breaking 27th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking 27th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Background

Maharashtra Breaking 27th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत नीती आयोगाची बैठक, देशातील विविध राज्याचे मुख्यमंत्री हजर राहणार, 2047 पर्यंत विकसित भारत हे बैठकिचं मुख्य उद्दिष्ट

2. मला भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं,  अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर, आता देश चालवतायत, पवारांची टीका

3. लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी कुठून आणणार? योजनेच्या मंजुरीपूर्वीच अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीकेचा सूर

4. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांच्याजवळ... खबरदारीसाठी लष्कराची एक तुकडी दाखल... तर चार तालुक्यातील शाळांना आज सुट्टी

5. सतरा वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तूर्तास बिकटच, सरकारकडून पुन्हा आश्वासनांचीच बरसात

11:43 AM (IST)  •  27 Jul 2024

Ahmednagar News : अहमदनगरच्या उड्डाण पुलावरून एक टेम्पो थेट खाली पडून भीषण अपघात, खासदार निलेश लंके घटनास्थळी उपस्थित

Ahmednagar News : अहमदनगरच्या उड्डाण पुलावरून एक टेम्पो थेट खाली पडून भीषण अपघात घडलाय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून या उड्डाणपूलावर वारंवार अशा घटना घडत आहे. दरम्यान, अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केलीये. या उड्डाण पुलावरील वळणं धोक्याची ठरत आहे. खासदार निलेश लंके यांनी याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. पुलावरील कठड्यांची उंची वाढवण्यासह पुलावर डांबराचा एक लेयर देण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या आहे. सोबतच  या संदर्भात संबंधित विभागाची लवकरच बैठक घेणार असल्याचं खासदार लंके यांनी सांगितल आहे.

11:40 AM (IST)  •  27 Jul 2024

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; प्रशासनाने ऑनफिल्ड सज्ज राहावे

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. 

11:39 AM (IST)  •  27 Jul 2024

Yavatmal News: कृषी केंद्राची तपासणी करण्यासाठी अमरावतीचे पथक महागांवात

Yavatmal News : यवतमाळच्या महागाव तालुक्यात मागील काही महिन्यापासून बोगस कंपनीच्या औषधी आणि बोगस खतांची विक्री जोमात सुरू आहे. याची माहिती अमरावती पथकाला लागताच त्यांच्यामार्फत महागांव शहरातील स्वराज अॅग्रो आणि इतर कृषी चालकाची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये काही औषधी, खतांचे नमुने अमरावती पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोबत घेतले असून ते तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. वास्तवात कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कृषी केंद्र चालकांना सहभागी असल्याने भोगस खते विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. घेण्यात आलेले नमुण्याचे निरीक्षण झाल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

11:38 AM (IST)  •  27 Jul 2024

Pooja Khedkar : पूजा खेडकर आहेत कुठे?

Pooja Khedkar : पुजा खेडकर कूठे आहेत हा प्रश्न वेगवेगळ्या तपास यंत्रणांना पडलाय. यु पी एस सी ने प्रशिक्षण थांबल्यानंतर पुजा खेडकर वाशीम मधुन निघाल्यावर कुठे गेल्यात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय खरा पण त्या दिल्ली पोलिसांना भेटलेल्या नाहीत. पुणे पोलिसांनी तीनवेळा नोटीस बजावून देखील त्या पुणे पोलिसांसमोर हजर झालेल्या नाहीत तर यु पी एस सी ने त्यांना मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात बोलावल्यानंतर त्या मसुरीला प्रशिक्षण केंद्रात गेल्या की नाही हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे पुणे पोलिसांनी पुजा खेडकर यांच्या आई वडीलांचा घटस्फोट खरंच झाला होता का याबाबत तपास करुन त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केलाय.

11:37 AM (IST)  •  27 Jul 2024

Washim News : भर पावसात सिमेंट रस्त्याचे काम; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Washim News : वाशिमच्या मंगरूळपीर नगरपालिका अंतर्गत सुरु असलेल्या  विविध विकास काम सुरु आहेत . मात्र,  कामाची मुद्दत संपण्या पूर्वी देयक काढायच्या नादात भर पावसात 500 मीटर च्या  12 लाख रुपये  किमतीचा  सिमेंट रस्ता भर पावसात  चिखलात रस्ता निर्मितीचा काम सुरु असल्याने  स्थानिक नागरिकांनी  या संदर्भात तक्रार नगर पालिका  प्रशासना कडे  केली असून.. तत्काळ काम बंद करून  पावसा नंतर काम सुरु करण्याची मागणी केली आहे    

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Threaten :  पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकीChhagan Bhujbal PC FULL: 2-4 दिवसांत शपथविधी होईल,  छगन भुजबळांची माहितीSanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर?  संजय राऊतांचं मोठ वक्तव्यPuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Embed widget