Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.
LIVE
Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात विविध घटना घडत आहे. तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडबाबत विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडा ते वसईपर्यंत मोठी वाहतूक कोंडी
पालघर- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडा ते वसईपर्यंत मोठी वाहतूक कोंडी
वाहतूकदार आणि प्रवासी त्रस्त,, गेल्या तीन तासापासून ही वाहतूक कोंडी असल्याची माहिती
या महामार्गाचे सिमेंट काँक्रीट काम सुरू असून ठेकेदार आणि संबंधित यंत्रणा यांचं वाहतूक नियंत्रण आणण्यासाठी नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी
ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई- ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीने मांडले. पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुंबईतील राम मंदिर स्टेशनजवळ एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार
मुंबईतून धक्कादायक घटना समोर
राम मंदिर स्टेशनजवळ एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार
सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला
एका अज्ञात रिक्षाचालकाने पीडितेवर हल्ला केल्याचा आरोप
मुंबई पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू
पीडित मुलगी मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली.
नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची चिन्हे
नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत १४.९५ टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही.
मालेगावच्या तत्कालीन तहसीलदारांसह, नायब तहसीलदार निलंबित
मालेगाव बांगलादेशी रोहिंग्या व जन्म दाखला घोटाळा प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मालेगाव दौऱ्याच्या पूर्व संध्येला मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसील संदीप धारणकर यांचे निलंबन करण्यात आले. शहा यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणाला महत्व प्राप्त झाले आहे.