Maharashtra Breaking News Live Updates : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव भाजप प्रदेश कार्यालयात घेणार आढावा, हालचालींना वेग
Maharashtra breaking News Live Updates: आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
![Maharashtra Breaking News Live Updates : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव भाजप प्रदेश कार्यालयात घेणार आढावा, हालचालींना वेग Maharashtra Breaking News Live Updates : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव भाजप प्रदेश कार्यालयात घेणार आढावा, हालचालींना वेग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/30c56a48ee621a34ce0346e5ddfbb6081732240735190988_original.png)
Background
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Result) 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. मतदानानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजात राज्यात कोणत्याही एका आघाडीला स्पष्टपणे कौल मिळणार की नेमकं काय होणार? याबाबत अस्पष्टता आहे. हीच बाब लक्षात घेता सत्तास्थापनेसाठी नेमकं काय करावं? यासाठी राजकीय गोटात खलबतं चालू आहेत. अपक्ष आणि बंडखोरांना संपर्क केला जातोय. मुंबईत बैठकांचे सक्ष वाढले आहे. या सर्व घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव भाजप प्रदेश कार्यालयात घेणार आढावा, हालचालींना वेग
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव भाजप प्रदेश कार्यालयात घेणार आढावा
सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या गोटातील हालचालींना वेग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी देखील गाठीभेटी सुरु
मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल
काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक सुरू, बडे नेते उपस्थित
काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक सुरू
बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले उपस्थित
उद्याच्या निकाला संदर्भात करणार चर्चा
निकाल हाती येताच काय तयारी करायची यावर होणार चर्चा
सोबतच सर्व उमेदवारांशी उद्याच्या तयारी संदर्भात ऑनलाईन करणार चर्चा
मतमोजणी सुरू असताना काय काळजी घ्यायची याचाही नेते उमेदवारांना करणार मार्गदर्शन
कोल्हापूर जिल्ह्यातील केरलेमध्ये शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघा शिक्षकांवर गुन्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील केरले मध्ये शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोघा शिक्षकांवर गुन्हा दाखल.
करवीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
शाळेचे दुरावस्थ असलेले गेट सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून बाजूला करायला लावल्या प्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल.
गेट बाजूला करत असताना लोखंडी गेट विद्यार्थ्यावर पडून सहावीत शिकणाऱ्या स्वरूप माने या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू.
शाळेचे लोखंडी गेट दोरीने आणि कापडाने बांधण्यात आले होते,
वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल..
शाळेच्या सीसीटीव्ही मध्ये शिक्षक सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गेट बाजूला करून घेत असल्याचं कैद.
वक्फ विधेयक आगामी सांसदीय अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाणार
वक्फ विधेयक आगामी सांसदीय अधिवेशनात मंजुरीसाठी मांडले जाणार
सोमवारपासून सुरु होणार आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन
अधिवेशनात १५ विधेयक मजुरीसाठी मांडली जाणार ; त्यामध्ये वक्फ विधेयकाचाही समावेश
सहकार क्षेत्रातील विद्यापीठासाठीही विधेयक मांडले जाणार
महायुतीकडून ‘प्लॅन बी’ची तयारी, बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटकपक्षांची मोट बांधणार
महायुतीकडून ‘प्लॅन बी’ची देखील तयारी
बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षांची मोट बांधणार
छोट्या छोट्या घटक पक्षाशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरु
छोट्या छोट्या घटक पक्षांना घेऊन महायुती सरकार बनवण्याचाही असणार प्रयत्न
सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न असणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)