Maharashtra Breaking LIVE Updates: सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून लवकरच केरळात दाखल होणार
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्याच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर आलंय. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.मुंबईच्या राजभवनात मंगळवारी सकाळी शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी आता भुजबळांवर देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. आता तेच खातं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळाना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
राज्यात पुन्हा कोरोनाची एन्ट्री
2020 साली चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला. लाखो लोकांनी जीव गमावला. मात्र त्यानंतर अख्खं जग यातून हळूहळू सावरलं. पण आता हाच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. भारतासह जगभरात कोरोना विषाणूबाधित नवे रुग्ण आढळतायत. मुंबईत 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाहीये.
किरण रिजीजू यांनी केला उद्धव ठाकरे यांना फोन, सर्वपक्षीय शिष्टमंडळात संदर्भात दिली माहिती
किरण रिजीजू यांनी केला उद्धव ठाकरे यांना फोन, सर्वपक्षीय शिष्टमंडळात संदर्भात दिली माहिती
विविध देशांना भेट देणारे भारतीय शिष्टमंडळ आणि शिवसेना युबीटी सहभाग-
केंद्रीय मंत्री श्री. किरेन रिजिजू जी यांनी काल पक्षाध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे जी यांच्याशी या शिष्टमंडळासंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला.
हे शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध आहे आणि याची खात्री मिळाल्यावर, आम्ही सरकारला आश्वासन दिले आहे की आम्ही या शिष्टमंडळाद्वारे आपल्या देशासाठी जे योग्य आणि आवश्यक आहे ते करू.
खासदार श्रीमती प्रियंका चतुर्वेदी जी देशभरातील इतर खासदारांसह शिष्टमंडळाचा भाग असतील.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, विशेषतः पाक-आधारित दहशतवादाविरुद्ध आणि त्यांचे तळ नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शविला आहे.
दहशतवादाविरुद्ध कारवाई करणाऱ्या सशस्त्र दलांमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुटप्पी मत असू नये.
पहलगामवरील राजनैतिक परिस्थिती आणि अयशस्वी गुप्तचर/सुरक्षा यंत्रणेबद्दल आपले मत आहे आणि आम्ही आपल्या देशाच्या, आपल्या देशाच्या हितासाठी प्रश्न विचारत राहू.
तथापि, पाकिस्तान आधारित दहशतवादाला एकाकी पाडण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर एकत्र आले पाहिजे.
आम्ही केंद्र सरकारला असेही कळवले आहे की या कारणासाठी आम्ही एकत्र असलो तरी, गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी या प्रतिनिधीमंडळांबद्दल पक्षांना चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा एक नियम पाळला जाऊ शकतो.
कालच कॉलद्वारे आम्ही राष्ट्रीय हिताच्या अशा कोणत्याही कृतीला आमचा पाठिंबा पुन्हा जाहीर केला आहे.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या विषयावर लवकरात लवकर चर्चा करण्यासाठी आणि यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली आहे.
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थानला भेट देणार; बिकानेर - मुंबई एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थानला भेट देणार
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात राजस्थानला करण्यात आले होते लक्ष्य
नरेंद्र मोदी २२ मे रोजी राजस्थान दौऱ्यावर
बिकानेर - मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा कंदील दाखवणार
सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधानाच्या हस्ते अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या देशनोक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान बिकानेर - मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडाही दाखवतील. त्यानंतर, ते 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार आहेत . यानिमित्ताने पंतप्रधान देशनोक इथे एका जाहीर कार्यक्रमाला संबोधितही करतील.























