Maharashtra Breaking LIVE Updates: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी आहे.. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती असणार आहे. मागील झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल एव्हिडन्सची मागणी करण्यात आली होती.. मात्र अद्याप या प्रकरणातील डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत पुन्हा याची मागणी केली जाऊ शकते. तर देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांवर पोहचली आहे. तर 24 तासांत 203 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बातम्यांसह देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने 90 जणांची फसवणूक; दीड कोटी रुपयांचा अपहार
-आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने नव्वद जणांची फसवणूक तर,दीड कोटी रुपयांचा अपहार...
- आरोग्य विभागात नोकरी लावून देण्यासाठी 90 जणांची फसवणूक...
- माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या नावाचा वापर केल्याचा संशय...
- आरोग्य विभागात विविध पदांवर पद भरतीच्या नावाने दीड कोटी रुपये उकळले...
- नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक...
- नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कविता भदाणे आणि वैभव पोळ या दोघांविरोधात गुन्हा दाखल...
धुळे, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती लावून देण्याचा अमित दाखवून तब्बल 90 उमेदवारांची दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुणाल भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर नाशिकच्या सरकार वडा पोलीस ठाण्यात कविता भदाने आणि वैभव पोळ या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या नावाचा देखील वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे यासंदर्भात सरकारवाडा पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
डोंबिवलीत मोफत हेअर कलर अनोखा उपक्रम; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्टंट
राजकीय मंडळींकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम, योजना, आणि प्रलोभनात्मक कार्यक्रम राबवले जातात. डोंबिवलीत लागलेल्या अनोख्या आणि विचित्र वाटणाऱ्या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि टीकेची लाट उसळवली आहे. "मोफत हेअर कलर शिबिराचे आयोजन", आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं उद्घाटन एका मराठी सिनेअभिनेत्रीच्या हस्ते करण्यात आले. हा बॅनर पाहताच अनेकांनी ट्रोल करत कमेंट पास केल्या आहे.
राजकीय मंडळींकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे विकास कामांचे बॅनर झळकलेले आपण अनेकवेळा पाहिले असतील मात्र एक अनोख्या उपक्रमाचा बॅनर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे तो चर्चेचा ठरलेला बॅनर म्हणजे मोफत हेअर कलरचा या उपक्रमाचे उदघाटन सिनेअभिनेत्रीच्या हस्ते पार पडले. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक जनार्धन म्हात्रे त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा जनार्धन म्हात्रे यांनी आयोजन केले होते. मोफत हेअर कलर उपक्रम प्रभागातील महिला आणि पुरुषांसाठी ठेवण्यात आले होते या उपक्रमाचा लाभ शेकडो महिला आणि पुरुषांनी घेतला























