Bhandara : पतीसोबतचा तिचा 'तो' प्रवास ठरला शेवटचा, संतप्त नागरिकांनी वाहन पेटवून दिलं, नेमकं काय घडलं?
Bhandara Accident : कल्पना हाडगे या मध्यप्रदेशातील वारासिवणीहून पतीसोबत नागपूरकडे जात होत्या, तिथेच त्यांना काळाने घेरले.
Bhandara Accident : कल्पना हाडगे (वय 29) या मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) वारासिवणीहून पतीसोबत नागपूरकडे (Nagpur) जात होत्या, तिथेच त्यांनी काळाने घेरले. समोरून आलेल्या वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. संतप्त नागरिकांनी अपघाताला कारणीभूत वाहन पेटवून दिलं असल्याची माहिती मिळत आहे. हा सर्व प्रकार भंडाऱ्यात घडला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या
दुचाकीला जबर धडक, पत्नीचा मृत्यू
भंडारा येथे भरधाव आलेल्या चारचाकी वाहनानं समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील कल्पना हाडगे (29) यांचा मृत्यू झाला. मृतक या मध्यप्रदेशातील वारासिवणी येथून त्या पतीसोबत नागपूरकडे जात होत्या. हा अपघात भंडारा तालुक्यातील मोहदुरा या गावाजवळ घडला.
संतप्त ग्रामस्थांनी वाहनाला पेटवलं
घडलेल्या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत असलेल्या चारचाकी वाहनाला पेटवून दिलं. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
अपघातांची मालिका सुरूच
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत अपघाताच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका काही थांबायचं नावंच घेत नाही. शुक्रवार-शनिवार असे दोन दिवस या महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरू होते, शुक्रवारी एका अपघाताची बातमी ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी संभाजीनगरच्या दौलताबादजवळ पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. रात्री 11 वाजेच्या सुमारास घडलेल्या अपघातात कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मृत तीन व्यक्ती हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी रात्री वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता आणि त्यात देखील तिघांचा मृत्यू झाला होता.