Belgaum : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्षातही बेळगावने जपलीय एक गोड ओळख! बेळगावचा सुप्रसिद्ध 'कुंदा', जाणून घ्या
Belgaum: बेळगाव म्हटलं की जसा सीमाप्रश्न डोळ्यासमोर येतो तसा पटकन आठवतो तो इथला कुंदा.. बेळगावच्या या कुंद्याची काय वैशिष्ट्यं आहेत आणि तो तयार कसा होतो?
Belgaum Marathi News : बेळगाव ( Belgaum ) म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो वर्षानुवर्ष सुरु असलेला महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील संघर्ष. पण याच कालावधीत बेळगावने समांतर अशी एक गोड ओळख स्वतःसाठी तयार केलीय. हा कुंदा (Kunda) तयार कसा होतो? बेळगावमधील कुंदा इतका प्रसिद्ध का आहे? जाणून घ्या
नव्या मिठाईला 'कुंदा' या मुलीच नाव
साठ वर्षांपूर्वी राजस्थानहून इथे येऊन मिठाईच दुकान चालवणाऱ्या जगन्नाथ पुरोहित या हलवाई कडून मिठाई तयार करताना खवा अधिक भाजला गेला आणि त्याचा रंगही बदलला. आता या मिठाईच करायचं काय? असा प्रश्न त्याला पडला. त्या हलवायाने तो खवा आणखी काही तास भाजला आणि या नव्या मिठाईला त्याच्या 'कुंदा' या मुलीच नाव दिलं. अशाप्रकारे अस्तित्वात आला
हा कुंदा तयार कसा होतो?
हा कुंदा तयार करण्यासाठी इथे शंभर किलो खव्यासाठी तीस किलो साखर वापरण्यात आलीय आणि हे मिश्रण एकसारखं हलवत राहावं लागतं. तीन तास एक मिनीट देखील हे हलवणं थांबवता येत नाही. कुंदा तयार होताना सतत ढवळावं लागतं. नाहीतर तो करपू शकतो. इथे एका मोठ्या कढईत साखरेचा पाक तयार करण्यात आला आणि यामधे खवा टाकला जातो. हा पाक तीस किलो साखरचा आहे तर, हा खवा शंभर किलोचा आहे. हा कुंदा तयार होण्यास तब्बल तीन तास लागतात
कुंदा तयार होण्यास सर्वात जास्त वेळ
आज बेळगावमधे कुंदा तयार करुन विकणारी शंभरहून अधिक दुकानं आहेत. राजस्थानमधून इथे येऊन स्थायिक झालेल्या पुरोहित समाजाकडून प्रामुख्यान हा व्यवसाय केला जातो. मिठाईच्या या कारखान्यात इतर अनेक प्रकारची मिठाई आहे. या ठिकाणी धारवाडी पेढे, म्हैसुरपाक, काजु कथली, गुलाबजाम, चिवडा तयार होतो बटाट्यचा कीस, शेंगदाणे, खोबरं हे सगळं तळून अशाप्रकारे हाताने इथं एकत्र करण्यात येतय. त्याचप्रमाणे इथे फरसाणही तयार होतो. पण कुंदा तयार होण्यास सर्वात जास्त वेळ लागतो आहे. आज बेळगावला गेलेली व्यक्ती कुंदा घेतल्याशिवाय परत येत नाही. एवढी विश्वासार्हता या कुंद्यान मिळवलीय.
इतर राज्यांमधेही पाठवला जातो कुंदा
बेळगाव भागात मिळणाऱ्या चांगल्या प्रतीच्या दुधाचा हा कुंदा लोकप्रिय होण्यात सिंहाचा वाटा आहे या दुधापासून तयार झालेला खवा इथल्या मिठाईच्या कारखान्यांमधे नियमितपणे विकल्याने इथल्या शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचा खात्रीचा स्त्रोत मिळालाय. हा कुंदा तयार करण्याच काम करणाऱ्याला इतर कोणताही व्यायाम किंवा जीम करण्याची गरज नाही. कारण इतकी मेहनत हा कुंदा तयार करताना करावी लागते. कुंदा तयार झाल्यानंतर तो गार करण्यासाठी या डब्यांमधे भरला जातो आणि तसाच दुकानात पोहचतो. तोपर्यंत दुकानात हा गरमागरम कुंदा घेण्यासाठी झुंबड उडालेली असते. बेळगावचा हा कुंदा आजूबाजूच्या शहरातच नाही तर इतर राज्यांमधेही पाठवला जातो. कुंदा तर अनेक ठिकाणी मिळतो पण बेळगावच्या कुंद्याची बातच न्यारीच
बेळगावने स्वतःसाठी तयार केली एक गोड ओळख
बेळगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वर्षानुवर्ष सुरु असलेला महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील संघर्ष. पण याच कालावधीत बेळगावने समांतर अशी एक गोड ओळख स्वतःसाठी तयार केलीय ती म्हणजे कुंदा नगरी म्हणून. सतत तीन तास खवा आणि साखर यांच मिश्रण शिजवल्यावर हा एकदम सॉफ्ट आणि तितकाच हेवी कुंदा तयार होतो. गमतीचा भाग म्हणजे मराठी आणि कानडींच्या या संघर्ष भूमीवर बेळगावला कुंदा नगरी म्हणून ओळख मिळवून दिलीय ती राजस्थानहून इथ आलेल्या पुरोहित समाजाने. मराठी आणि कानडी दोघेही हा कुंदा आवडीने खातात. संघर्षची तीव्रता कमी करायची असेल तर असेच गोड धागे जोडायचे असतात.
इतर महत्वाच्या बातम्या
9th December Headlines: कोल्हापुरात आजपासून जमावबंदीचा आदेश, मोदींची महाराष्ट्रातील खासदारांसोबत भेट