एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

LIVE

Key Events
Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Background

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडेपाच वाजता राज्य मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर चहापानाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांतर्फे सर्व पक्षांच्या आमदारांना आमंत्रण देण्यात आलं आहे. 

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यासाठी आजपासून विविध पक्षातील नेते आणि आमदारांच्या आगमनाला सुरुवात होणार आहे. यंदा अधिवेशन अवघ्या दहा दिवसांचे असून त्यात येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत अशा उपरोधिक आशयाचे बॅनर विमानतळावर लावण्यात आले आहेत.  विदर्भात होणारे अधिवेशन किमान सहा आठवड्यांचे असावे अशी मागणी होत असते. विरोधी बाकांवर असताना प्रत्येक पक्ष किमान तीन आठवड्यांचा अधिवेशन घ्या, असा आग्रह धरतो. यंदा 7 ते 20 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात फक्त दहा दिवस कामकाज होणार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दहा दिवसांच्या अधिवेशनाची खिल्ली उडवण्यासाठी विमानतळावर प्रत्येकाच्या नजरेस पडेल अशा दर्शनी भागांत बॅनर लावले गेले आहेत. 

नागपुरात 'मुंबई'वरून राडा

मुंबई महापालिकेवरून ठाकरे शिंदेंमध्ये जोरदार झुंपणार असल्याचं पाहायला मिळत आहे. काल (मंगळवारी) उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या निवडणुका आणि कंट्रादारांवरून एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली होती. या अधिवेशनात कोविड घोटाळे, रस्ते घोटाळे, नाले सफाई घोटाळे आणि खिचडी घोटाळ्यांवर चौकशी लावण्याची मागणी विरोधक करणार असून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनिती आखली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या नेत्यांच्या विविध घोटाळ्यात चौकशा सुरू आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा आखाडा मुंबईच्या मुद्द्यांवर गाजणार हे मात्र नक्की. 

13:36 PM (IST)  •  06 Dec 2023

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट कोणत्या मुद्द्यांवर राज्य सरकारला घेणार?

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: उद्धव ठाकरेंनी दिल्यात पक्षाच्या सर्व आमदारांना अधिवेशनासाठी विशेष सूचना

शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने उपस्थित केले जाणार

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे अधिवेशनामध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर ठाकरे गट आपली ठाम भूमिका मांडणार आहे

शेतकऱ्यांचा झालेला नुकसान राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले जाणार

राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात सरकारला प्रश्न उपस्थित केले जाणार

मुंबईतील आमदार मुंबईतील सर्वसामान्यांचे प्रश्न उपस्थित करणार 

मुंबईतील आमदारांना सामान्य नागरिकांच्या समस्यावर आणि विशेष करून मुंबईतील उद्भवणाऱ्या समस्यांवर प्रश्न उपस्थित करण्याच्या सूचना दिल्या आहेत

मुंबई महापालिकेचा रस्ते कॉंक्रिटीकरण घोटाळा, फर्निचर घोटाळा व इतर काही महत्त्वाचे घोटाळे समोर आणून राज्य सरकार समोर प्रश्न उपस्थित केले जातील

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कडाडून विरोध केला जाणार

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडून केला जाणार असल्याने या निर्णयाला कडाडून विरोध सभागृहात सुद्धा ठाकरे गटाकडून केला जाईल

एकीकडे अधिवेशन सुरू असताना मुंबईत याच धारावी पुनर्विकास प्रकल्प विरोधात ठाकरे गट मोर्चा काढून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरेल

आरोग्य विभागाशी संबंधित प्रकरण अधिवेशनात बाहेर आणली जाणार 

आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आरोप करत बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची व्यवहार होत असल्याचे काही पुरावे सादर करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असेल

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणावरून सरकारला जाब विचारला जाणार 

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरण सुद्धा गृह विभाग आणि आरोग्य विभागाला ठाकरे गटातून घेरण्याचा प्रयत्न होईल

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अधिवेशनादरम्यान सहभाग

उद्धव ठाकरे हे 11 किंवा 12 डिसेंबर दरम्यान नागपुरात अधिवेशनासाठी उपस्थित राहतील तर आदित्य ठाकरे हिवाळी अधिवेशनात पूर्णपणे सहभागी राहून सरकारला या अशा अनेक प्रश्नांवर जाब विचारणार

12:26 PM (IST)  •  06 Dec 2023

Nagpur Adhiveshan 2023 : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज तीन वाजता पत्रकार परिषद

Nagpur Adhiveshan 2023 : उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. अधिवेशनासाठी विरोधकांनीही आपापली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेच्या आधी महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अधिवेशन स्ट्रॅटर्जी ठरवली जाईल आणि चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल. 

12:24 PM (IST)  •  06 Dec 2023

Nagpur Hiwali Adhiveshan 2023: नागपुरात 'मुंबई'वरून राडा

Nagpur Hiwali Adhiveshan 2023: मुंबई महापालिकेवरून ठाकरे शिंदेंमध्ये जोरदार झुंपणार असल्याचं पाहायला मिळत आहे. काल (मंगळवारी) उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या निवडणुका आणि कंट्रादारांवरून एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली होती. या अधिवेशनात कोविड घोटाळे, रस्ते घोटाळे, नाले सफाई घोटाळे आणि खिचडी घोटाळ्यांवर चौकशी लावण्याची मागणी विरोधक करणार असून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनिती आखली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या नेत्यांच्या विविध घोटाळ्यात चौकशा सुरू आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा आखाडा मुंबईच्या मुद्द्यांवर गाजणार हे मात्र नक्की. 

12:22 PM (IST)  •  06 Dec 2023

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: विरोधकांकडून विमानतळावर उपरोधिक आशयाचे बॅनर

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यासाठी आजपासून विविध पक्षातील नेते आणि आमदारांच्या आगमनाला सुरुवात होणार आहे. यंदा अधिवेशन अवघ्या दहा दिवसांचे असून त्यात येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत अशा उपरोधिक आशयाचे बॅनर विमानतळावर लावण्यात आले आहेत.  विदर्भात होणारे अधिवेशन किमान सहा आठवड्यांचे असावे अशी मागणी होत असते. विरोधी बाकांवर असताना प्रत्येक पक्ष किमान तीन आठवड्यांचा अधिवेशन घ्या, असा आग्रह धरतो. यंदा 7 ते 20 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात फक्त दहा दिवस कामकाज होणार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दहा दिवसांच्या अधिवेशनाची खिल्ली उडवण्यासाठी विमानतळावर प्रत्येकाच्या नजरेस पडेल अशा दर्शनी भागांत बॅनर लावले गेले आहेत. 

12:21 PM (IST)  •  06 Dec 2023

Maharashtra Assembly Winter Session LIVE : उद्या संसदेचं हिवाळी अधिवेशन

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडेपाच वाजता राज्य मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर चहापानाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांतर्फे सर्व पक्षांच्या आमदारांना आमंत्रण देण्यात आलं आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget