सचिन अहिर, अंबादास दानवे ते अनिल परब, ठाकरेंच्या तीन आमदारांनी फडणवीसांना घेरलं, ललित पाटील प्रकरण सभागृहात गाजलं
ललित पाटीलच्या अटकेमुळे उघड झालेल्या बड्या ड्रगरॅकेटवरून आज विधानपरिषदेत चर्चा झाली. ललित पाटीलची नार्को टेस्ट करा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी केली.
नागपूर : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणाची आज सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे सचिव सचिन अहिर (Sachin Ahir), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) ते अनिल परब (Anil Parab) या ठाकरेंच्या तीन आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरलं आहे. ललित पाटीलची नार्को टेस्ट करा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहीर यांनी केली. तर शाळा कॉलेजांबाहेर सर्रास ड्रग्ज विकली जातायत. तसंच हुक्कापार्लर हे ड्रग्जचे अवैध अड्डे बनलायला लागली आहेत असा आरोप केला. तर अवैध हुक्कापार्लरवर कारवाई सुरू असून शाळा कॉलेजेस जवळच्या हजारो पानटपऱ्या पाडल्याची माहिती दिली. तसंच राज्यात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन झाल्याची माहिती दिली.
ललित पाटील प्रकरणं म्हणजे आंतरराष्ट्रीय ड्रगज रॅकेट आहे. गृहमंत्री यांच्यासमोर मोठा टास्क आहे. कारण ललित पाटील स्वतः म्हणाला आहे की मी पळून गेलो नाही मला पळून लावलं तरी अजूनही संजीव ठाकूरला अटक झालेली नाही तसेच बाकी अरोपी यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सचिन अहिरांनी केली आहे.
मी जर बोललो तर मोठा स्फोट होईल : अनिल परब
ललित पाटिल प्रकरण म्हणजे एक पिढी बरबाद करण्याचं काम आहे. मुंबई उपनगरात ड्रग्ज मोठ्या प्रमाणत वापरलं जातं आहे. मुंबईत याचे कारखाने आहेत. हल्ली बिल्डिंगचे वॉचमन सुद्धा ड्रगज विकत आहेत. हुक्का पार्लर पासून याची सुरुवात होतं आहे. जे विकत आहे त्यांना ताबडतोब जामीन मिळत आहे. आरोपीला रुग्णालयात ठेवण्यासाठी मुंबईत पर डे पैसै दिले जात आहेत. मी तुम्हाला लिस्ट देतो की मुंबईत कोणत्या हॉस्पीटलमध्ये कोणता आरोपी बसला आहे. मी जर बोललो तर मोठा स्फोट होईल, असेही अनिल परब म्हणाले.
राज्यात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन : फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शाळेजवळ असलेल्या 2 हजार पानटपऱ्या तोडून टाकल्या आहेत. हुक्का पार्लर उद्ध्वस्त केले आहेत. 174 नायजेरियन लोकांना ताब्यात घेतलं आहे. ज्यावेळी त्यांना अटक केली त्यावेळी लक्षात आलं की, या नायजेरियन लोकांना पोलीसांनी अटक करावी हीच त्यांची भावना आहे. त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर त्यांना भारतात राहायला आणखी परवानगी मिळते. गुन्हा दाखल असल्यामुळे आपण त्यांच्या देशात त्यांना पाठवू शकत नाही. त्यामुळं आपण आता डिटेंशन सेंटर सुरु केलं आहे. यामधे त्यांना ठेवण्यात येईल. 2021 साली सरकारला पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्र दिलं होतं. ललित पाटील बाबत माहिती दिली होती. त्यावेळी आपण त्याची चौकशी करू शकलो नाही. त्यावेळी कुणी त्याला परवानगी दिली नाही. आता अँटी ड्रग्ज टास्कफोर्स सुरू केला आहे.