एक्स्प्लोर

जिनके घर शीशे के होते है, वो दूसरों के घर पत्थर नही फेका करते; संजय राऊतांच्या टीकेला नितीन राऊत यांचे प्रत्युत्तर

नितीन राऊत यांनी विदर्भातील 62 जागांवर आपला दावा केला. त्यानंतर यावर बोलताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली, तर नितीन राऊत यांनी देखील शेरो शायरी करत संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

Nagpur News नागपूर : नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी बोलताना विदर्भातील 62 जागांवर दावा केला होता. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून या जागा आम्ही लढवणार, असे सुतोवाच नितीन राऊत यांनी केलं होतं. यावर बोलताना  संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी आज आपली प्रतिक्रिया देत मिश्किल टोला लगावला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आणि नितीन राऊत जर विदर्भातील 62 जागांवर दावा करत असतील तर, त्या जागा आम्ही त्यांना सोडू. तसेच या 62 जागा सोडून राज्यात उरलेल्या इतर जागा आहे त्यावर आम्ही लढू.

त्यांनी विदर्भावर दावा केला तर आम्ही उर्वरित महाराष्ट्रावर आम्ही दावा करू, असे देखील ते म्हणाले होते. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्यात विदर्भातील जागांवरू चांगलीच खडाजंगी रंगल्याचे बघायला मिळाले आहे. तर दुसरीकडे नितीन राऊत यांनी देखील शेरो शायरी करत संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जिसके घर सिसेके होते है, वो दुसरोंके घरोपर पत्थर नही फेका करते- नितीन राऊत

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात पवार गट, ठाकरे गट जर जागांवर दावा करत असेल तर पक्ष म्हणून आम्हालाही काही जागांवर दावा करण्याचा अधिकार आहे. कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, हे संजय राऊत ठरवणार नाही. किंवा मिही देखील हे ठरवू शकत नाही. मुख्यमंत्री पदाबाबत माध्यमात चर्चा करुन होत नाही. त्यासाठी पक्षातील उच्चपदस्थ नेत्यांशी चर्चा करावी लागते. संजय राऊत यांनी आमच्या हायकमांडशी याबाबत बोलावं. शिवसेनेच्या सर्वेबाबत आम्हाला कल्पना आहे. मुंबईत ते सर्वे करत आहे. तसेच ते मराठवाड्यातंही सर्वे करत आहे.

महाविकास आघाडीने एक संयुक्त सर्वे करावा आणि ज्याच्या जास्त जागा सर्वेत दाखवेल त्यांनी त्या लढाव्या, असे आमचे मत आहे. तर विदर्भातील 62 जागा आमच्या बाजूनं आहे, हा आमचा सर्वे सांगतोय. त्यामुळे जिनके घर शीशे के होते है, वो दूसरों के घर पत्थर नही फेका करते, असे म्हणत नितीन राऊत यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत? 

नितीन राऊत हे आमचे मित्र आहेत. विदर्भाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळं प्रेम आहे. तर त्यांना 62 जागा हव्या असतील तर बरं होईल, ते मग 62 जागावरच लढणार. काँग्रेस आणि नितीन राऊत जर विदर्भातील 62 जागांवर दावा करत असतील तर, त्या जागा आम्ही त्यांना सोडू. तसेच या 62 जागा सोडून राज्यात उरलेल्या इतर जागा आहे त्यावर आम्ही लढू. त्यांनी विदर्भावर दावा केला तर आम्ही उर्वरित महाराष्ट्रावर आम्ही दावा करू, असा मिश्किल टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बोलताना लगावला आहे. ते आज नागपूर येथे बोलत होते.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयाचं वाटप, शरद पवारांच्या पक्षाचा NCP असाच उल्लेखRaj Thackeray Thane  :राज ठाकरेंची ठाण्यातल्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटBappa Majha : डोळ्याचे पारणं फेडणारे उत्सवाचे रंग, उत्सवाचा राजा 'बाप्पा माझा' ABP MajhaMIM Mumbai Morcha : रामगिरी महाराज, नितेश राणेंविरोधात MIM चा 23 तारखेला मुंबईत मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Mangal Gochar 2024 : तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा
चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा
Malaika Arora Father Anil Arora passed Away : वडिलांच्या निधनाने खचली मलायका, सात्वंन करण्यास पोहचले सलीम खान, अर्जुन कपूर; पाहा फोटो...
वडिलांच्या निधनाने खचली मलायका, सात्वंन करण्यास पोहचले सलीम खान, अर्जुन कपूर; पाहा फोटो...
Embed widget