एक्स्प्लोर

बंडखोरांचा फायदा कुणाला, फटका कुणाला, किती बंडखोर विधानसभेत

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने वेगवेगळी निवडणूक न लढवता युती आणि आघाडी करत एकत्रित निवडणूक लढवली. या कारणामुळे अनेक ठिकाणी बंडखोरांचे पेव फुटले. तर काही ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी डावलल्यामुळे बंडखोरांनी मैदान गाजवले. या बंडखोरांमुळे राज्यात कुठे आणि कुणाला नुकसान झाले. किती जागांवर बंडखोरांनीच मैदान मारले हे जाणून घेऊयात...

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल हाती आला असून महायुतीने जरी बाजी मारली असली तरी अपेक्षेप्रमाणे यश त्यांच्या हाती लागलेले नाही. शरद पवारांच्या झंझावातामुळे राष्ट्रवादी आणि महाआघाडीने जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकीचे एक महत्वाचे वैशिष्टय ठरले ते म्हणजे अनेक ठिकाणी झालेली बंडखोरी. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने वेगवेगळी निवडणूक न लढवता महायुती आणि महाआघाडी करत एकत्रित निवडणूक लढवली. या कारणामुळे अनेक ठिकाणी बंडखोरांचे पेव फुटले. तर काही ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी डावलल्यामुळे बंडखोरांनी मैदान गाजवले. या बंडखोरांमुळे राज्यात कुठे आणि कुणाला नुकसान झाले. किती जागांवर बंडखोरांनीच मैदान मारले हे जाणून घेऊयात... वांद्रे पूर्व मतदारसंघ म्हणजे मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली. महाडेश्वर आणि सावंत या दोघांच्या भांडणात काँग्रेसचे झिशान सिद्दिकी फक्त ५ हजार ७९० मतांनी निवडून आले. झिशान सिद्दिकी यांना ३८ हजार ३३७ मतं मिळाली. महाडेश्वरांना ३२ हजार ५४७ तर बंडखोर तृप्ती सावंत यांना २४ हजार ७१ मतं मिळाली. तिथेच एमआयएमच्या उमेदवाराला १२ हजार ५९४ तर मनसेच्या उमेदवाराला १० हजार ६८३ मतं मिळाली. सोलापूर मध्य मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी एमआयएमच्या हाजी फारुक शाब्दींना १२ हजार ७१९ मतांनी हरवलं. अवघड मानला जात असताना शिवसेनेतील बंडखोरीने त्यांचा विजय सुकर बनवला. शिवसेना बंडखोर महेश कोठे यांनी ३० हजार ८१ मतं  मिळाली. तर शिवसेनेच्या दिलीप माने चौथ्या स्थानावर गेले त्यांना २९ हजार २४७ मतं पडली. प्रणिती शिंदेंना ५१ हजार ४४० मतं तर शिवसेनेच्या दोघांना मिळून ५९ हजार ३२८ मतं मिळाली. बार्शी – ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आलेल्या दिलीप सोपल यांना बंडखोर राजेंद्र राऊत यांनी ३ हजार ७६ मतांनी हरवलं. राजेंद्र राऊत यांना ९५ हजार ४८२ मतं पडली तर दिलीप सोपल यांना ९२ हजार ४०६ मतं पडली दर्यापूर – भाजपचे विद्यमान आमदार रमेश बुंदीले विरूद्ध भाजप बंडखोर सीमा सावळे अशी लढत झाली. यात बंडखोर जावळे पराभूत झाल्या. धुळे शहर विधानसभा मतदार संघ युतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या विरुद्ध भाजप पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले अनिल गोटे तसेच राष्ट्रवादीचे बंडखोर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे अशी लढत होती. यामध्ये बंडखोरांच्या बंडखोरीचा लाभ एमआयएमच्या उमेदवाराला झाला आणि एमआयएमचे  शाह फारूक अन्वर हे विजयी झाले. शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे बंडखोर डॉ. जितेंद्र ठाकूर विरुद्ध भाजपचे उमेदवार काशीराम पावरा अशी लढत होती, यात बंडखोर ठाकूर  पराभूत झाले. साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मोहन सुर्यवंशी यांच्या विरुद्ध भाजपच्या बंडखोर मंजुळा गावीत यांचं आव्हान होतं. तिथं मंजुळा गावित यांनी बाजी मारली. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ  भाजप उमेदवार समीर कुणावार यांच्यासोबत अपक्ष उमेदवार अशोक शिंदे (शिवसेना बंडखोर) यांची लढत होती. इथे समीर कुणावार विजयी झाले. देवळी मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार रणजित कांबळे यांच्यासोबत अपक्ष उमेदवार राजेश बकाणे (भाजपचे बंडखोर) यांचे आव्हान होते, कांबळे यांनी ते मोडीत काढले. नांदेड दक्षिणमध्ये शिवसनेच्या राजश्री पाटील यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर दिलीप कंदकुरते यांनी बंडखोरी केली होती. याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला झाला. आणि काँग्रेसचे मोहन हंबर्डे हे विजयी झाले. हदगाव विधानसभा मतदार संघात  बाबुराव कदम ( सेना बंडखोर )यांनी लढत विद्यमान सेना आमदार नागेश पाटील यांचा पत्ता कट केला. या दोघांचा वादात काँग्रेसचे माधवराव पवार इथून विजयी झाले. वसमतमध्ये शिवसेनेचे आमदार तथा माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्यासमोर अॅड, शिवाजी जाधव यांनी बंडखोरी केली. या लढतीत राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे यांनी विजयी बाजी मारली.  बंडखोर शिवाजी जाधव (अपक्ष ) व माहायूतीचे उमेदवार जयप्रकाश मुंदडा यांच्यात टफ फाईट होती मात्र नवघरे यांनी विजय मिळवला. नांदगाव मतदारसंघात शिवसेना सुहास कांदे, राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांना भाजपाचे बंडखोर रत्नाकर पवार यांच्यात लढत होती. यामध्ये सुहास कांदे यांनी भुजबळांचा पराभव केला. चिंचवड विधानसभा क्षेत्रात भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राहुल कलाटे यांनी अपक्ष उभे राहत बंडखोरी केली होती. मात्र जगताप विजयी झाले. औरंगाबाद पश्चिम शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या विरोधात भाजपाचे बंडखोर राजू शिंदे उभा होते. मात्र तरीही शिरसाट विजयी झाले. शिराळा मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांचे आव्हान होते, त्यात भाजपच्या सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केल्याने शिवाजीराव नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आणि ते पराभूत झाले. यात मानसिंगराव नाईक यांना फायदा झाला. उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे  अजित पिंगळे यांनी बंडखोरी केली होती. मात्र तरीही कैलास पाटील यांचा विजय झाला. भिवंडी पूर्व मतदारसंघ संतोष शेट्टी हे भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष होते त्यांनी ऐन वेळेस बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसची उमेदवारी घेत महायुती समोर निवडणूक लढवली, मात्र इथे त्यांना धक्का बसला तो एमआयएमच्या उमेदवाराचा. रईस शेख इथून विजयी झाले. वणीमध्ये भाजपच्या संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्यासमोर मनसेच्या राजू उंबरकर यांच्यासह शिवसेना बंडखोर विश्वास नांदेकर, सुनील कातकडे या दोघांचे आव्हान होते. यात बोदकुरवार यांनी बाजी मारली. शहापूरमध्ये राष्ट्रवादीतून पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश करून तिकीट मिळवलं तर शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीतून तिकीट मिळवले. त्यामुळे पक्ष बदलले असले तरी उमेदवार मात्र तेच असल्याने शहापूर विधानसभा क्षेत्रात पुन्हा एकदा दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा यांच्यात लढत झाली. परिणामी बरोरा यांना पराभव स्वीकारावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Embed widget