एक्स्प्लोर

तापी मेगा रिचार्ज प्रकल्प! महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात करार, 2 लाख 34 हजार हेक्टर क्षेत्राला फायदा : मुख्यमंत्री 

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत (Tapi Mega Recharge Project) महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) ऐतिहासिक करार झाला आहे. याचा विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला फायदा होणार आहे.

Devendra Fadnavis : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत (Tapi Mega Recharge Project) महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) ऐतिहासिक करार झाला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्यातील 2 लाख 34 हजार 706 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत आज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

कसा आहे तापी मेगा रिचार्ज प्रकल्प?

तापी नदीवर मध्यप्रदेशातील खरिया गुटी घाट येथे धरण
एकूण सिंचनाला लाभ : 3,57,788 हेक्टर
महाराष्ट्राला लाभ : 2,34,706 हेक्टर (जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती) (म्हणजेच सुमारे 5.78 लाख एकर)
मध्यप्रदेशला लाभ : 1,23,082 हेक्टर (बुर्‍हाणपूर, खंडवा)
एकूण पाणीवापर : 31.13 टीएमसी
महाराष्ट्र : 19.37 टीएमसी/मध्यप्रदेश : 11.76 टीएमसी
योजनेची किंमत : 19,244 कोटी (2022-23 ची किंमत)

या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत आज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भोपाळ येथे दिली.
सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक आज भोपाळ येथे झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तुलसीराम सिलावट, कुंवर विजय शाह आणि दोन्ही राज्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 2,34,706 हेक्टरला सिंचनलाभ होईल

आजचा दिवस हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशसाठी ऐतिहासिक आहे. ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाचा आम्ही पूर्वीच संकल्प केला होता. आज त्यावर दोन्ही राज्यांनी सहमती केली आणि त्यासाठी सामंजस्य करार झाला. यापूर्वी ही बैठक 2000 मध्ये बैठक झाली होती, त्यानंतर 2025 मध्ये ही बैठक झाली. परंतू या प्रकल्पाबाबत दोन्ही राज्य परस्परांच्या संपर्कात होते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी आंतरराज्य जलकरारांना गती देण्यास सांगितले आणि 2016 पासून आम्ही याला गती दिली. तापी मेगा रिचार्ज हे जगातील एक आश्चर्य आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 2,34,706 हेक्टरला सिंचनलाभ होईल, तर मध्यप्रदेशला 1,23,082 हेक्टर सिंचनलाभ मिळेल. महाराष्ट्रात जिथे खारपाणपट्टा आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या समस्या आहेत, तेथे मोठा लाभ या प्रकल्पामुळे होणार आहे. यात जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा या पट्ट्यात मोठा दिलासा मिळेल. शेतकर्‍यांच्या जीवनात मोठी क्रांती होईल आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल. केंद्रीय योजना म्हणून याचा स्वीकार व्हावा, अशी विनंती आता आम्ही दोन्ही मुख्यमंत्री मिळून केंद्र सरकारकडे पुन्हा करणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

जामघाटमुळे नागपूर शहरासाठी पुढच्या 30-40 वर्षांसाठी पाणी मिळणार

या बैठकीत महाराष्ट्राचे मुद्दे सुद्धा आम्ही मांडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यात डांगुर्ली बॅरेज, जामघाट असे महत्त्वाचे मुद्दे होते. या जामघाट प्रकल्पासाठी 28 वर्षांपूर्वी मी मध्यप्रदेशात तत्कालिन मुख्यमंत्र्यांसोबत आलो होतो. पण, आता त्यालाही गती मिळते आहे, याचा आनंद आहे. या जामघाटमुळे नागपूर शहरासाठी पुढच्या 30-40 वर्षांसाठी पाणी मिळणार आहे. आता ऑक्टोबरमध्ये पुढची बैठक घेण्यात येईल. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश कोणत्या क्षेत्रात एकत्रित काम करु शकते, यादृष्टीने सुद्धा अनेक बाबींवर यावेळी चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या:

विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटी रुपयांचं अनुदान मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वितरण, हेक्टरी किती मिळणार अनुदान?  

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO

व्हिडीओ

Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
Embed widget