एक्स्प्लोर

Agriculture News : राज्यात काही भागात ढगाळ वातावरण, कापसासह 'या' पिकांना फटका बसण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत

Agriculture News : राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचा फटका शेती पिकांना (Agricultural crops) बसत आहे.

Agriculture News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचा फटका शेती पिकांना (Agricultural crops) बसत आहे. कापसासह, तूर, हरभरा, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळं रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain) देखील झाला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडले असून, याचाही पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं ढगाळ वातावरण आहे. काल (5 जानेवारी) अनेक तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं जिल्ह्यातील हरभरा, तूर, कापूस आणि गहू या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आज मोठ्या प्रमाणावर दाट धुक्याची चादर पसरली असून, धुक्यामुळं हरभरा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळं पिकांवर पडत असलेल्या रोगराईमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे. अवकाळी पावसानंतर आज दाट धुक्याची चादर पसरलेली आहे. त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि इतरही मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अनेक भागात वाहने चालवणे सुद्धा कठीण झालेले आहे

गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात धुके, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता

गोंदिया जिल्ह्यात अनेक भागात धुके पसरले आहे. त्यामुळं रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढत असताना सकाळी सर्वदूर धुके दाटले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा शहरात आज सकाळी सर्वाधिक दाट धुके दिसले. समोरचे दिसत नसल्याने वाहतूक संथ झाली होती. सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा आनंद घेतला.

हिंगोली जिल्ह्यात धुक्याची चादर, हरभरा, गहू, तूर यासह आंब्याच्या बागा संकटात 

हिंगोली जिल्ह्यांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीच्या तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. हिंगोलीचे तापमान 16 अंश सेल्सिअस वर पोहोचल्याने जिल्हाभरात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर जिल्हाभरात सर्वदूर धुक्याची चादर पसरली आहे. या संपूर्ण हवामानाच्या बदलाचा फटका शेतातील पिकांना बसत आहे. हरभरा, गहू, तूर यासह आंब्याच्या फळबागा संकटात सापडल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळं या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याच्या झाडांना लागलेला मोहर या ढगाळ वातावरणामुळं कमी होऊ शकतो. परिणामी उत्पादनात सुद्धा घट होऊ शकते. तर धुक्याच्या दाट चादरीमुळं दृश्यमानता कमी झाली आहे. सकाळीच हिंगोली शहरात जाणारे दूधवाले  त्याचबरोबर गाड्यांच्या चालकांना वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.

बदलत्या वातावरणामुळं नांदेड जिल्ह्यात रब्बी पिकांना धोका

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर काही तालुक्यात झालेल्या हलक्या पावसामुळं हरभरा, तूर, गहू, ज्वारी या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या ढगाळ वातावरणामुळं बहरात आलेला आंबेमोहोर गळून आंबा फळबागेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. आज सकाळी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात दाट धुक्याची चादर पसरलीय. या धुक्यामुळे हरभरा, तूर, ज्वारी या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान या बदलत्या वातावरणामुळं पिकांवर रोगराई येऊन शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन आर्थिक भुर्दंड बसणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : कोकणात थंडी उशीरा सुरु, आंब्यासह काजू उत्पादक चिंतेत; यंदा हापूस उशिरा मिळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पेटवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडांवर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Embed widget