Maharashtra Headlines 30th June : दुपारच्या बातम्यांमध्ये वाचा राज्यातील प्रमुख घडामोडी
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, अश्लील चाळे आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप
पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. वाचा सविस्तर
बलात्काराच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
बलात्कार, हत्येच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या तरुणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला चोप दिला आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात ही घटना घडली आहे. लाखांदूर पोलिसांनी बेड्या ठोकून आरोपीची तुरुंगात पुन्हा रवानगी केली. वाचा सविस्तर
सिंधुदुर्गात सूर्यास्त पॉईंटवरुन 700 फूट खोल दरीत कार कोसळली, दैव बलवत्तर म्हणून दाम्पत्याचा जीव वाचला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीतील करुळ घाटात सूर्यास्त पॉईंटवर 700 फूट खोल दरीत कार कोसळली. दैव बलवत्तर म्हणून कारमधील दोघांचा जीव वाचला. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात गाडीतील दोन प्रवासी दरीत कोसळले. इथून जाणाऱ्या वाहनचालकांनी वैभववाडी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर वैभववाडी पोलीस पथक आणि सह्याद्री जीवरक्षक टीम करुळ घाटात पोहोचली. पोलीस आणि सह्याद्री जीवरक्षक टीमने अपघातग्रस्तांचा शोध घेत रात्री उशिरा दोघांनाही रेस्क्यू केलं. दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन सोडण्यात आले. वाचा सविस्तर
भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार शिवरायांचा पुतळा उभारणार
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष देत गेली साडेतीनशे वर्षे ऐतिहासिक सिधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात डौलाने उभा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यात महाराजांचे एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिन यावर्षी सिंधुदुर्ग किल्ल्यावर होत आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्याचा संकल्प भारतीय नौदलाने केला आहे. महाराजांनीच त्याकाळी पाहिलं नौदल सुरु केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने भारतीय नौदलाचे जनक आहेत. वाचा सविस्तर
ठाकरेंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात; राहुल कनाल यांचा उद्या पक्षप्रवेश
1 जुलै रोजी ठाकरे गट मुंबई महापालिकेविरोधात विराट मोर्चा काढणार आहे. पण त्याच दिवशी ठाकरेंना धक्का बसणार आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल उद्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, पक्षाला जाहीर रित्या जय महाराष्ट्र करत असल्याचंही राहुल कनाल यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर