एक्स्प्लोर

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 26 डिसेंबर 2021 : रविवार : ABP Majha

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1.  3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण, 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठांना बुस्टर डोस, पंतप्रधान मोदींचं जनतेला न्यू इयर गिफ्ट 

PM Narendra Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणासह (Vaccination) बूस्टर डोस संबधी देखील माहिती दिली. तसंच सध्या सुरु असलेल्या सणांच्या काळातही काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.  

त्यानंतर दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे बूस्टर डोसबाबत मोदींनी केली. ती म्हणजे आरोग्य कर्मचारी (Health Workers) अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना (Frontline Workers) दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदीनी सांगितलं. याची सुरुवात 10 जानेवारी, 2021 पासून होणार आहे. त्यानंतर तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचं यावेळीन मोदींनी सांगितलं.

अजूनही काळजी घेणं महत्त्वाचं

कोरोनाच्या संकटाबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारत या संकटाचा सामना मोठ्या शिताफीने करत असल्याचं सांगतिलं. आतापर्यंत 141 कोटी जनतेचं लसीकरण झालं असून आपली अर्थव्यवस्थाही उस्ताहजनक आहे. दरम्यान लसीकरण कोरोनाविरुद्ध एक मोठं शस्त्र असल्याचंही ते म्हणाले. तसंच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, कोरोना अजूनही गेला नसल्याने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

2. राज्य सरकारकडूनही पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं स्वागत, राज्यात योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येईल, आरोग्यमंत्री टोपेंची प्रतिक्रिया

3. लहान मुलांसाठी पहिल्या स्वदेशी लशीला हिरवा कंदील, 12 ते 18वयोगटातील मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस मिळणार

4. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस हायकमांड कुणाला कौल देणार याची उत्सुकता शिगेला, संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण आणि के. सी. पाडवींच्या नावाची चर्चा
 
5. सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतच शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन मिळणार, काकड आणि शेजारतीसाठी भक्तांना प्रवेश नाही, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानं निर्बंध

6. राज्यातील थंडी कमी होणार, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, तर 28 आणि 29 डिसेंबरला मराठवाड्यातील काही भागात पावसाचाही अंदाज

7.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपतीला पायी निघालेल्या शिवसैनिकाचा मृत्यू, सुमंत रुईकरांच्या रुपात कडवा शिवसैनिक हरपल्याची भावना

8.यंदाच्या वर्षातील शेवटची 'मन की बात' आज, पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशाचे लक्ष

9. शेतकरी विरोधी भूमिका घ्याल तर पुन्हा आंदोलन, कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार

10. आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात, वाद विसरुन आफ्रिकन सफारी फत्ते करण्याचा विराटसेनेचा निर्धार, टीम सिलेक्शनचा गुंता सोडवण्याचं आव्हान 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्यMahayuti Goverment : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह युतीचे नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावाDevendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी बैठक, वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणारDevendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
Embed widget