Nashik News : नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात विनापरवाना ऑडिशन, तरुण तरुणींना पळता भुई थोडी
Nashik News : नाशिकच्या (Nashik) शासकीय विश्रामगृहात (Nashik Guest House) विनापरवाना चित्रपटाचे ऑडिशन (Audition) घेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
Nashik News : नाशिकच्या (Nashik) शासकीय विश्रामगृहात (Nashik Guest House) विनापरवाना चित्रपटाचे ऑडिशन (Audition) घेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शासकीय विश्रामगृह परिसरात तरुण तरुणींची वर्दळ पाहायला मिळत होती. अशातच शासकीय विश्रामगृहामध्ये एका खोलीत चित्रपटाचे ऑडिशन सुरू असल्याचे निदर्शनास आले. नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानाच्या पाठीमागे अनेक वर्षांपासून शासकीय विश्रामगृह कार्यरत आहे. मात्र अनेकदा वादाच्या भोवऱ्यात विश्रामगृह सापडले आहे. अशातच आता चित्रपट निर्मिती करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसने परस्पर ऑडिशन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान शासकीय विश्रामगृह हे राज्यातील मंत्री, नेते यांच्यासाठी राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असते. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकही या ठिकाणी राहतात. अशाच एका प्रोडक्शन हाऊसच्या संबंधिताने एका दिवसाकरिता खोली बुक केली होती. त्यांनी विश्रामगृह प्रशासनाला न कळवता खोलीवरच ऑडिशन घेतली. या ऑडिशनसाठी जाहिरातही काढण्यात आलेली होती. सकाळपासून ऑडिशनसाठी शासकीय विश्रामगृहामध्ये अनेक तरुण आणि तरुणींची वर्दळ पाहायला मिळत होती. विचारणा केली असता फिल्मचं ऑडिशन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. आयोजकांना परवानगी बाबत विचारणा केली असता त्यांची एकच धावपळ उडाली. अनेक तरुण-तरुणीनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. त्याचबरोबर आयोजकांनी देखील काढता पाय घेतला.
शासकीय विश्रामगृहामध्ये अशा पद्धतीने कोणत्याही चित्रपटाच्या ऑडिशनला परवानगी देण्यात येत नाही. जे या सगळ्या ऑडिशनचे जे आयोजक होते. भगवान बागुल त्यांनी खरंतर शासकीय विश्रामगृहामध्ये फक्त राहण्यासाठी एक सूट त्याठिकाणी घेतलेला होता. मात्र त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता परस्पर त्या सूटमध्ये तरुण आणि तरुणींचा त्या फिल्मसाठी ऑडिशन सुरू केलेलं होतं. एकेका तरुण तरुणीला रूम मध्ये बोलवून ऑडिशन घेतली जात होती. या रूममध्ये कॅमेऱ्याचा सेटअप लावण्यात आलेला होता. त्यांची ऑडिशन घेतली जात होती.
दरम्यान शासकीय विश्रामगृहाच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबत सांगितले कि, विनापरवानगी ऑडिशनच्या आयोजकांवरती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शाखा अभियंता किरण पवार यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहामध्ये अशा पद्धतीने चित्रपटाच्या ऑडिशनला परवानगी देण्यात येत नसल्याचे ते म्हणाले. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मागील वर्षी देखील ऑडिशन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याआधी देखील एका मुलीने शासकीय विश्रामगृहामध्ये एका आमदाराने लैंगिक छळ केल्याची तक्रार केली होती. तर मागच्या काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी एका खुनाच्या आरोपीतील संशयितांची वाहने शासकीय विश्रामगृहात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे नाशिकच्या शासकीय विश्रामगृह सुरक्षिततेबाबत व्यवस्थापन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाच्या ठरणार आहे.