एक्स्प्लोर

Nashik News : काळा पैसा गेला कुठे? नाशिकमध्ये युवक राष्ट्रवादीकडून नोटबंदीला श्रद्धांजली, 

Nashik News : नोटबंदी करण्याच्या निर्णयाला 06 वर्षे होत असून यामुळे नाशिक राष्ट्रवादीकडून (NCP) नोटबंदीला श्रद्धांजली वाहत निषेध नोंदवला. 

Nashik News : नोटबंदीने (Demonetization) जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी संपूर्ण देशाला रांगेत उभे करून अनेकांचा बळी घेतला. नोटबंदी नंतर जवळपास 99 टक्के नोटा परत आल्या. यामुळे काळा पैसा गेला कुठे असा सवाल जनतेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 08 नोव्हेबर 2016 रोजी नोटबंदी करण्याच्या निर्णयाला 06 वर्षे होत असून यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून (NCP) नोटबंदीला श्रद्धांजली वाहत निषेध नोंदवला. 

नाशिक (Nashik) शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसने आज 08 नोव्हेंबर ला केलेल्या नोटबंदीच्या निषेधार्थ श्रद्धांजली आंदोलन केले. राष्ट्रवादी भवन परिसरात हे आंदोलन करण्यात आले. सन 2016 मध्ये पंतप्रधानांनी नोटबंदी करण्याचा निर्णय घेतला, पंरतु या नोटबंदीच्या निर्णयाचा विसर सर्वत्र पडलेला दिसतो. भाजप सुद्धा या निर्णयावर मौन बाळगून असून जनतेने हा निर्णय विसरावा असे प्रयत्न सतत होत असतात. नोटबंदी स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक मोठी घोडचूक होती. या निर्णयाने भारताची अर्थव्यवस्था अपंग झाली असून अर्थव्यवस्थेचा कणा या निर्णयामुळे मोडला. काळ्या पैशावर कारवाई, बनावट नोटा चलनातून हद्दपार करणे, दहशतवादी व  नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखणे  व कॅशलेस व्यवहार करणे हे यामागे उद्देश होते. परंतु यातील कॅशलेस व्यवहार या मुद्दा सोडला तर वरील एकही मुद्दा यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले नाही. यापुढील काळातही कॅशलेस व्यवहारावर कर लावण्याच्या तयारीत असल्याचे केंद्र सरकार दिसत आहे.

नोटबंदीने जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी संपूर्ण देशाला रांगेत उभे करून अनेकांचा बळी घेतला. नोटबंदी नंतर जवळपास ९९ टक्के नोटा परत आल्या. यामुळे काळापैसा गेला कुठे असा सवाल जनतेत आहे. नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघु उद्योगांवर झाला, नोटबंदीपुर्वी बहुतांशी उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते. नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे उद्योग ठ्प्प झाले. दहशतवादी व नक्षलवाद्यांच्या कारवाया अजूनही सुरुच असून त्यांच्या माध्यमातून बनावट चलनी नोटा बाजारपेठात आल्या आहेत. एकंदरीत सर्व प्रकरण बघता रांगेत बलिदान दिलेले नागरिक, अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने कर्जात बुडालेली जनता व लघु उद्योग बंद पडल्याने आत्महत्या करणारे मजूर  यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

थिएटर चालकांना निवेदन 
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असून त्यांच्या बाबतीत चुकीचा इतिहास 'हर हर महादेव' चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आल्याने सदरच्या चित्रपटाचा शो पुन्हा दाखविण्यात येऊ नये असा इशारा युवक राष्ट्रवादीच्या वतीने पी.व्ही.आर. सिनेमाचे व्यवस्थापक यांना देण्यात आला.  'हर हर महादेव' या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचा विपर्यास करण्यात आला असून हे कदापि सहन करण्यासारखे नाही. त्यामुळे हर हर महादेव चित्रपट पुन्हा दाखविण्यात येऊ नये असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्या, सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Maharashtra Breaking LIVE Updates: स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्या, सुधीर मुनगंटीवारांची मागणी
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Nagpur Crime News: चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
चिमुकल्याने अंगावर रंग उडवला, आजी संतापली, नातवाच्या अंगावर कडकडीत गरम पाण्याची बादली उपडी केली, नागपूरमधील धक्कादायक घटना
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या घातपाताचा संशय, देवगिरी बंगल्यावर रात्री 20 आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग
राष्ट्रवादीचे 20 आमदार रात्री देवगिरी बंगल्यावर, सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या त्या वस्तू सर्वांसमोर ठेवल्या
Ashok Hande Beaten Up Over Parking Issue: 'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद विकोपाला, आरोपीची ऑफिसमध्ये घुसून बॅटनं मारहाण
'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; पार्किंगचा वाद विकोपाला, आरोपीची ऑफिसमध्ये घुसून बॅटनं मारहाण
Maharashtra Farmer Loan Waiver मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
मोठी बातमी: फडणवीस, शिंदे, पवार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
Embed widget