एक्स्प्लोर

महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा गौरव

शौर्यशाली सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यांना गौरविण्यासाठी त्यांना पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. इतिहासात महार रेजिमेंटच्या पराक्रमी सुपूत्रांचा सन्मान करणारे महाराष्ट्र शासन पहिले शासन असल्याचे बडोले यांनी सांगितले आहे.

मुंबई : आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर देश संरक्षणात बाजी मारलेल्या महार बटालियनच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महार बटालियनच्या अमृत महोत्सवानिमित्त महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा गौरव केला जाणार आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे शनिवार, 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे,सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण व भव्य सत्कार समारंभ आयोजित केला आहे. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांतीकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळवली. महार रेजिमेंटने 9 युध्दक्षेत्र सन्मान आणि 12 रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत. तसेच 1 परमवीर चक्र, 1 अशोक चक्र, 9 परम विशिष्ट सेना पदक, 4 महावीरचक्र, 4 कीर्तीचक्र, 1 पद्मश्री, 3 उत्तम युध्द सेवा पदक, 16 अतिविशिष्ट सेवा पदक, 30 वीरचक्र, 39 शौर्यचक्र पदक, 220 सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने 2 चिफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच 2 आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे. शौर्यशाली सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यांना गौरविण्यासाठी त्यांना पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. इतिहासात महार रेजिमेंटच्या पराक्रमी सुपुत्रांचा सन्मान करणारे महाराष्ट्र शासन पहिले शासन असल्याचे बडोले यांनी सांगितले आहे. यावर्षी देण्यात येणाऱ्या 2 पुरस्कारांमध्ये महावीर चक्र मेडल आणि अनसंग हिरो मेडलसाठी प्रत्येकी 51 हजार रूपयांचा धनादेश, 16 वीरचक्र मेडलसाठी प्रत्येकी 31 हजार, 26 सेवा मेडलसाठी प्रत्येकी 21 हजार आणि 1 अति विशेष सेवा मेडलसाठी 16 हजार तर 4 विशेष सेवा मेडलसाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Ratan Tata Sad Demise  : उद्योगपती रतन टाटा यांना शरद पवारांकडून श्रद्धांजलीABP Majha Headlines :  7  AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM On Ratan Tata Sad Demise : रतन टाटा एक दयाळू आत्मा आणि विलक्षण मानव होते यांच्या निधनाने दु:खDeepak Kesarkar on Ratan Tata Sad Demise : रतन टाटा यांचं निधन, सरकारने जाहीर केला एक दिवसाचा दुखवटा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Embed widget