एक्स्प्लोर
महादेव जानकरांचं स्वप्न पूर्ण, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महादेव जानकर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी 9 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महादेव जानकर अनेक दिवसांपासून कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी करत होते. शिवाय त्यांनी वारंवार नाराजीही बोलून दाखवली होती. अखेर कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकरांसह अनेकांना सुखद धक्का दिला आहे. संभाजी निलंगेकर, जयकुमार रावळ, सुभाष देशमुख, पांडुरंग फुंडकर आणि राम शिंदे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला गृहराज्यमंत्रिपद! काल दिवसभराच्या चर्चा, खलबतांनंतर अखेर शिवसेनेनं उत्तर महाराष्ट्रातले गुलाबराव पाटील आणि मराठवाड्यातील अर्जुन खोतकर यांची मंत्रिपदासाठी निवड केली आहे. अर्जुन खोतकर यांना गृहराज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात अधिकृतपणे घोषणा केली. फुंडकरांना कृषी तर राम शिंदेंचं प्रमोशन एक गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार असल्याने भाजपच्या राम शिंदे यांचं प्रमोशन होणार असल्याचं कळतं आहे. त्यांच्यासोबत सुभाष देशमुख यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. खडसेंच्या गच्छंतीमुळे रिक्त झालेलं कृषीमंत्रिपद पांडुरंग फुंडकर यांच्याकडे तर उत्पादन शुल्क विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच विनोद तावडे यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खात्यांचा पदभार गिरीश महाजनांकडेच सोपवण्यात येणार असल्याचं कळतं आहे. तर मदन येरावर यांना वस्त्रोद्योग मंत्रालय दिलं जाण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















