मोठी बातमी : महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत मोठी घडामोड; काँग्रेस नेते शरद पवारांच्या घरी जाणार
Maha Vikas Aghadi Seat Sharing Meeting : या बैठकीनंतर अंतिम जागावाटपाचा निर्णय घेऊन अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
Maha Vikas Aghadi Seat Sharing Meeting : लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Lok Sabha Election Date) आज जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर आता जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. अशात महाविकास आघाडीतील जागावाटपांचा (Maha Vikas Aghadi Seat Sharing) तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसचे नेते (Congress leader) थोड्याच वेळात शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरी जाणार आहेत. काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेनिथल्ला आणि राज्यातील महत्त्वाचे नेते शरद पवारांची भेट घेणार आहेत. कालच्या बैठकीत झालेल्या चर्चेवरती आज पुन्हा एकदा शरद पवारांशी चर्चा केली जाणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीत शिवसेनेची (Shiv Sena) मागणी आणि वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aaghadi) प्रस्ताव यावरती चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, या बैठकीनंतर अंतिम जागावाटपाचा निर्णय घेऊन अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून आतापर्यंत अनेक बैठका झाल्या असून, आज अंतिम बैठक होत असल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीमधील जागावाटप करतांना काही जागांवरून एकमत होत नसल्याचे चित्र आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावावर देखील अंतिम निर्णय झालेला नाही. अशात आज निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे जागावाटपावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेसचे नेते थोड्याच वेळात शरद पवारांच्या घरी जाणार आहेत. यावेळी होणाऱ्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
'या' दोन जागांवरून तिढा कायम...
महाविकास आघाडीच्या जागावाटपात दोन जागावरील तिढा कायम आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या जागांवरती तिढा कायम असल्याची माहिती मिळत आहे. सांगली आणि रामटेक या दोनही जागेवरती शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची रस्सीखेच सूर आहे. या दोनही जागांवरती काल चर्चा झाली, मात्र मार्ग निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा यावरती चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
वंचितने प्रस्ताव फेटाळला...
महाविकास आघाडीत जागावाटपाचा निर्णय अजूनही होऊ शकला नाही. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर निर्णय होत नसल्याने जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याची चर्चा आहे. अशात वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला प्रस्ताव वंचितने फेटाळून लावला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघा व्यतिरिक्त दोन जागांचा प्रस्ताव वंचितला देण्यात आला होता. मात्र, तो प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळला आहे. आम्ही अकोल्याची जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. असे असतांना आम्हाला पराभव होणाऱ्या दोन जागा दिल्या जात आहे. त्यामुळे त्या जागा आम्हाला नको असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे (VBA) मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे (Siddharth Mokle) यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! अंबादास दानवे नाराज, शिंदे गटात जाणार?; थेट मातोश्रीवर मनधरणीचे प्रयत्न