एक्स्प्लोर
'लोणावळा हत्याकांडाची कसून चौकशी करा'

पुणे: लोणावळ्यातील तरुण - तरुणीच्या मृत्यूची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. दोघेही पुण्यात इंजिनिअरिंगला होते. मात्र रविवारी गायब झालेल्या या दोघांचे मृतदेह सोमवारी लोणावळ्यातील जंगलात सापडले होते. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले आणि शरिरावर जखमा असल्याने, त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळेच चौकशीची मागणी कुटुंबियांनी केली आहे. काय आहे प्रकरण? लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मृत तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. तरुण अहमदनगरच्या राहुरीचा, तर तरुणी मूळची पुण्याच्या ओतूरची होती. हे दोघेही रविवारी संध्याकाळपासून गायब होते. मात्र सोमवारी संध्याकाळी लोणावळ्यातल्या आयएनएस शिवाजी समोर आणि भुशी धरणाच्या टेकडीवर या दोघांचे थेट मृतदेहच सापडले. विवस्त्र करुन तीक्ष्ण वस्तूवर डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. तसंच दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत. दोन्ही मृतदेहांचे हात-पाय बांधण्यात आले होते. तर अंगावर आणि डोक्यावर जबर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय वर्तवण्यात येतोय. दरम्यान हे दोघं तिथे कसे पोहचले. त्यांच्यासोबत नेमकं काय झालं. याचा तपास लावण्याचं आव्हान पोलिसांपुढे निर्माण झालं आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. लोणावळा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बातम्या
लोणावळ्यातील जंगलात इंजिनिअरिंगचे तरुण-तरुणी मृतावस्थेत आढळले
लोणावळ्यात तरुण-तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला
आणखी वाचा























