Nitin Gadkari : Nitin Gadkari: 'तो' दिवस दूर नाही, जगभरातील विमाने नागपुरात इंधन भरतील; नितीन गडकरींची गॅरंटी
Nitin Gadkari: तो दिवस दूर नाही ज्या दिवशी नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल आणि त्यावेळी जगभरातील विमान नागपुरात इंधन भरायला येतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बोलताना व्यक्त केलाय.
Bhandara Gondia Loksabha: या देशातील शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर, तो आता ऊर्जा निर्माता देखील झाला पाहिजे. हरियाणा आणि पंजाबमध्ये धाणाच्या तनसापासून डांबर निर्मिती होत आहे. तसा प्रोजेक्ट हा पानिपत येथे आहे. आपल्या तनसापासून एक लाख लिटर इथेनॉल, 180 टन डांबर, 76 हजार टन हवाई इंधन तयार करण्यात आले आहे. म्हणून आगामी दिवसात तो दिवस दूर नाही ज्या दिवशी नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल आणि विदर्भातला (Vidarbha) शेतकरी हवाई इंधन तयार करेल. त्यावेळी जगभरातील विमान नागपुरात (Nagpur) इंधन भरायला येतील, कारण आपण दोन रुपयाहून अधिक कमी दराने हवाई इंधन जगाला पुरवू. असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बोलताना व्यक्त केलाय. भंडारा-गोंदिया लोकसभा (Bhandara Gondia Loksabha) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेसाठी आज नितीन गडकरी हे भंडाऱ्याच्या मोहाडीत आले असता, त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलंय.
कोणी माईचा लाल नाही जो हे दाखवेल की...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात राईस मिलची आर्थिक अवस्था चांगली नाही आहे. कामगारांना वर्षभर हाताला काम मिळत नाही. त्यामुळे आपण इथेनॉलची निर्मिती करणारा उद्योग उमरेड जवळ आणला आहे. या प्लांटमध्ये दररोज चार लाख लिटर प्रति दिवस इथेनॉलची निर्मिती होत आहे. तर पुढील दोन महिन्यात प्रत्येक दिवसाला दोन लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन घेणारा प्रकल्प आपण सुरू करत आहोत. यासाठी दररोज 600 टन तांदळाची आवश्यकता आम्हाला भासणार आहे. आज सभेला उपस्थित प्रत्येकाच्या गाडीमध्ये आम्ही निर्माण केलेल्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल असल्याचेही गडकरी म्हणाले. आज कदाचित तुम्ही या गोष्टीवर विश्वास करणार नाही, मात्र आज असा कोणी माईचा लाल नाही जो हे दाखवेल की, आजवर मी जे बोललो आणि ते झाले नाही, असा शेराही गडकरी यांनी बोलताना मारला आहे.
मी कधीही खोटं बोलत नाही - नितीन गडकरी
माझं वक्तव्य आज रेकॉर्ड करून घ्या. मी कधीही खोटं बोलत नाही. समोर एक लाख लोक असले तरी एखादी काम होत नसल्यास मी सरळ त्यांना नकार देतो. मी 90 टक्के समाजकारण आणि केवळ दहा टक्के राजकारण करत आलो आहे. जातीपातीच्या राजकारणात तर मी कधीही पडत नाही. जो मला मत देईल त्याचे मी काम करेल आणि जो मत देणार नाही, त्याचे देखील मी काम करेल, असेही नितीन गडकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या