एक्स्प्लोर

Satara Lockdown | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 17 जुलैपासून साताऱ्यात लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद?

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी साताऱ्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत संपूर्ण सातारा जिल्हा लॉकडाऊन करण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीमुळे साताऱ्यात लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. तरिही अंशतः दुकानं सुरु ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच होता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काल साताऱ्यातील विविध प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत करण्यात आलेली चर्चेत साताऱ्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत संपूर्ण सातारा जिल्हा लॉकडाऊन करण्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. पाच दिवसांच्या लॉकडाऊनंतर 22 जुलै ते 26 जुलैपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीतच अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं उघडी राहणार असल्याचंही या अध्यादेशातून सांगण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ : संपूर्ण सातारा जिल्हा 17 ते 22 जुलैदरम्यान लॉकडाऊन,कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आदेश

लॉकडाऊन दरम्यान पुढील बाबी संपूर्ण जिल्ह्यात बंद राहतील :

  • सर्व किराणा दुकानं, सर्व किरकोळ आणि ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ही दुकानं सुरु राहतील.
  • उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट संपुर्णत: बंद राहतील.
  • वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकानं 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत घरपोच सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • झोमॅटो, स्विगी, डॉमिनोज आणि इतर ऑनलाईन पोर्टलवरुन मार्गविले जाणारे खादयपदार्थ पुरवठा सेवा तसेच हॉटेल रेस्टॉरंट यांचेमार्फत देणेत येणारी घरपोच सेवा 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत घरपोच सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • सार्वजनिक ठिकाणं, खाजगी क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्यानं, बगीचे हे संपुर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक करण्यासही परवानगी दिलेली नाही.
  • ब्युटी पार्लर्स, सलून, स्पा दुकानं पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.
  • भाजीपाला मार्केट, फळ विक्रेते यांची दुकानं 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीतच अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं उघडी राहणार आहेत.
  • मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादी पदार्थांची विक्री 17 जुलैपासून 22 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. त्यानंतर 22 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 या कालावधीत सुरु राहतील.
  • शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील
  • सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहतील, तथापि अत्यावश्यक सेवेनील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे येणे करिता व वैदयकीय कारणास्ताव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापरास परवानगी राहील.
  • सार्वजनिक प्रवासी वाहतूकीतील एसटी बस ही अत्याश्यक सेवेच्या खाजगी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि परवानगी घेऊन चालू असलेल्या उदयोगातील अधिकृत कर्मचारी यांच्यासाठी परवानगी राहील. तसेच अत्यावश्यक वस्तू यांचा घाऊक स्वरुपात पुरवठा करणारी वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात आली आहे.
  • सर्व प्रकारची खाजगी बांधकाम्/कन्स्ट्रशनची कामे संपूर्णतः बंद राहतील, तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांसाठी निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरु ठेवता येईल. तसेच शासनाची शासकीय कामे चालू राहतील.
  • सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलरतरण तलाव, करमणुक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र प्रेक्षागृह, सभागृह संपुर्णतः बंद राहतील.
  • सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील, मात्र दिनांक 14 जुलैपुर्वी परवानगी घेण्यात आलेले खाजगी जागेतील आणि मंगल कार्यालयातील लग्न समारंभास 20 पेक्षा कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करता येतील
  • सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि सभा संपूर्णतः बंद राहतील.
  • धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तीकरिता बंद राहतील, तथापि, सर्व धार्मिक स्थळ, सार्वजनिक प्रार्थनास्थळातील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.
  • एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण, रेशन दुकान नियमानुसार सुरु राहील.
  • दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी. 06.00 ते. 10.00 या कालावधीत सुरु राहील.
  • पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहील.
  • निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु राहील.
  • सर्व मेडीकल दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू रहतील, तथापि, ऑनलाईन औषध वितरण सेवा व हॉस्पिटल संलग्न औषधांची दुकाने 24 तास कालावधीकरीता सुरु राहतील.
  • औदयोगिक व अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, अंतरजिल्हा, अंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरु राहील.
  • शेती व दुग्ध व्यवसाय तसेच कुक्कुटपालन या अनुषंगीक कामे करण्यासाठी मान्यता राहील.
  • सर्व न्यायालये व राज्य शासनाचे/केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरु राहतील, शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्यात यावा. शासकीय कार्यालयांना आवश्यक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही. तथापि संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः चे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.
महत्त्वाच्या बातम्या :  Thane Lockdown | ठाण्यात लॉकडाऊनमुळे फायदा की तोटा? कोरोनातून सावरत धारावी पुन्हा नव्या जोमात उभी, मुंबई पोलिसांचं मोठं योगदान लातूरमध्ये उद्यापासून पूर्णतः लॉकडाऊन! किराणा दुकानं आणि भाजीपाला मार्केटही बंद राहणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Embed widget