एक्स्प्लोर
Advertisement
Lockdown 5.0 | राज्यातील शासकीय कार्यालयं टप्प्याटप्प्यानं सुरू होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियमावली जाहीर
केंद्र सरकारने देशात पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक-1' लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत. अटीशर्थींसह राज्यातील शासकीय कार्यालय टप्प्या टप्प्याने सुरू होणार आहे. त्यासाठी आरोग्य खात्याने नियमावली जाहीर केली आहे.
मुंबई : देशात पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन 5.0 ची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या लॉकडाऊनची मर्यादा 1 जून ते 30 जूनपर्यंत असणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हा लॉकडाऊन केवळ कंटेनमेंट झोनपुरताचं असणार आहे. अन्य ठिकाणी हळूहळू निर्बंध उठवण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. अटीशर्थींसह राज्यातील शासकीय कार्यालय टप्प्या टप्प्याने सुरू होणार आहे. त्यासाठी आरोग्य खात्याने नियमावली दिलेली आहे. कार्यालय आणि कर्मचाऱ्यांनी काय खबरदारी घ्यायची याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कार्यालयासाठी सर्वसाधारण नियम
- कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी-अधिकारी आणि कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक
- हवा खेळती राहण्यासाठी दार-खिडक्या उघडी ठेवावी.
- सर्व कर्मचाऱ्यांनी तीन पदरी असलेल्या मास्कचा वापर करणे बंधनकारक
- तोंडाला आणि नाकाला सतत हात लावणे टाळावे
- खोकला-सर्दी झालेली असेल तर टीश्यू पेपर, स्वच्छ धुतलेल्या रूमालाचा वापर करावा
- कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर राखणे बंधनकारक
- कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागत अर्थात कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक
- कार्यालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था
- तसेच स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करणे बंधनकारक, स्वच्छतागृहाचा वापर केल्यास हात साबणाने धुणे बंधनकारक
- लिफ्ट, बेल, बटन, टेबल-खुर्ची आणि इतर उपकरणे दिवसातून तीन वेळा 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छ पुसून घ्यावीत
- कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा अल्कोहल मिश्रीत सॅनिटायझरने पुसून घ्यावे
- कार्यालय साबण व पाण्याने धुवून घेणे
- या सर्व मार्गदर्शक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक.
अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सूचना
- एकाच वाहनातून अनेकांनी प्रवास करू नये
- ई-ऑफिसचा वापर जास्तीत जास्त करावा, ई-मेलवरून फाईल्स शक्यतो पाठवून द्याव्या
- कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश द्यावा.
- येणाऱ्या प्रत्येकाचे स्क्रीनिंग थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक
- मिटींग्ज शक्यतो व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून घ्याव्यात प्रत्यक्ष घेण्याचे टाळावे.
- सदर काळामध्ये ऑफिसमध्ये बसून एकत्र डबा खाणे, किंवा एकत्र जमा होणे टाळावे.
कार्यालयात एखाद्यास संसर्ग झाल्यास
- सदर व्यक्तीला 100 पेक्षा जास्त ताप असेल तर त्याला लगेच रूग्णालयात दाखल करावे.
- अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबधित कर्मचाऱ्यांना 14 दिवस कार्यालयी प्रवेश देवू नये. त्याबाबत आरोग्य विभागाच्या आदेशाचे पालन करावे.
- पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे जे 3 फूटापेक्षा कमी अंतरावरील आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त कालावधीत असतील तर त्यांचे हाय रिस्क मध्ये वर्गीकरण करावे.
- तसेच तीन फुटाहून जास्त अंतराने संपर्कात आलेल्यांना लो रिस्कमध्ये वर्गीकरण करावे.
- हाय रिस्क मध्ये गणना केलेल्या व्यक्तींची संस्थात्मक विलीगीकरणात रवानगी करावी.
- Lockdown 5.0 | लॉकडाऊन 5.0 मध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी मिळणार परवानगी
- Lockdown 5.0 | देशभरात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, लॉकडाऊन कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित
- Lockdown 5.0 | आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवासावर काहीही निर्बंध नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement