एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होणार, सरकारची 'कृषी कर्ज मित्र' योजना - काय आहे योजना

शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजनेस शासनाने मान्यता दिली आहे.

मुंबई  : इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी कर्ज मित्र योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत मोठा प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जातो. यात शेतकऱ्यांचा कल जा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त असतो. सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यामार्फत कर्जाचे वितरण केले जाते. शेतकरी नवीन पीक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेत असतांना त्याला सात-बारा उताराऱ्यापसून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा बराच कालावधी लागतो व कधी कधी हंगाम ही संपून जातो. नाईलाजाने शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून जास्तीच्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. यास्तव शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज मित्र योजना राबविण्यात येत आहे.
 
अल्प  मुदतीकरिता प्रथमत: पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यास प्रति प्रकरण 150 रूपये सेवाशुल्क असेल तर मध्यम व दिर्घ मुदतीचे नवीन कर्ज प्रकरणाचा सेवाशुल्क रूपये 250 इतका असेल. मध्यम व दिर्घ मुदतीच्या कर्ज प्रकरणाच्या नुतनीकरणाचा दर प्रति प्रकरण रूपये 200 इतका आहे. कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतवर नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तीची यादी तयार झाल्यानंतर त्यास जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मान्यता असणार आहे. कृषी कर्ज मित्र हा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्याच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजुरीसाठी बँकेकडे सादर केले. कृषी कर्ज मित्राने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांस सहाय्य व सल्ला देणे याविषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे.

कृषी कर्ज मित्राला शेतकऱ्याच्या शिफारशीसह सेवाशुल्क मागणी यादी बँकेकडे सादर करावी लागणार असून बँकेकडून त्याची शहानिशा झाल्यानंतर त्या गट विकास अधिकारी यांच्याकडे सेवा शुल्क अदायगीसाठी यादी सादर केली जाणार आहे. या योजनेचा कालावधी सन 2021-22 असा असून आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी वाढवणे वा कमी करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे.  
 
या शासन निर्णयामुळे गरजू शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचेही ग्रामविकास व कामगार मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget