Maharashtra: महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील विधी निदेशक पगारी विना!
Maharashtra: महाराष्ट्र पोलिसांच्यावतीनं राज्यामधील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत.
Maharashtra: महाराष्ट्र पोलिसांच्यावतीनं राज्यामधील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत. या दहा पोलीस सेंटरमध्ये चार हजार नवीन भरती झालेले पोलीस प्रशिक्षण घेत असतात. या पोलिसांना कायदेविषयक ज्ञान व्हावं या उद्देशाने 2006 मध्ये एक जीआर काढण्यात आला होता.तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक राकेश मारिया यांच्या नेतृत्वात हे काम करण्यात आलं होतं. या जीआरनुसार नवीन भरती होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कायदे विषयक माहिती देण्यासाठी विधी व्याख्याते हे पद निर्माण करण्यात आले होते.
राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रात 99 पदे मंजूर करण्यात आली होती. यापैकी 70 पदेही भरण्यात ही आली आहेत. या 70 पदांपैकी 40 पदावर महिला विधि निदेशक आहेत. विधी निदेशक म्हणून 2006 पासून हे विधीज्ञ सेवा बजावत आहेत. हे पद कंत्राटी स्वरूपाच आहे. 23 हजार रुपये महिना मानधनावर हे पद भरण्यात येते. 2006 पासून दर तीन वर्षांची टर्म आहे. अकरा महिन्याचा करारानुसार ह्या विधि निदेशक कडून सेवा घेतली जाते.
या निदेशक विधि यांच्या मार्गर्शनाखाली आयपीसी अॅक्ट, सीआरपीसी अॅक्ट, भारतीय पुरावा कायदा, पोलीस कायदा, वाहतुकीचे नियम आणि कायदे या विषयावर पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी अकरा महिन्याची टर्म दिली जाते. अशी तीन वर्ष एका विधी व्याखातेकडून पूर्ण करून घेतली जाते. यावर्षी 2018 मध्ये टर्म सुरू झाली होती. मात्र कोविड काळामध्ये ती पूर्ण होऊ शकली नाही. आता कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.असे असताना ही सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली नाही.
"70 विधी निदेशक पैकी अनेकांच्या पाच ते तीन महिन्यापासून पगार ही करण्यात आली नाही. कोविड काळात कोर्ट बंद होते. त्यातच आता पोलीस प्रशिक्षण केंद्रांमधील पगारी बंद अशा दुहेरी संकटात अडकलेल्या वकिलांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी कायद्याचा मार्गही अवलंबता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.तसेच अनेक ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन, मंत्री व अधिकारी याना मानधन मिळत नाही असे सांगितले असता सरकारकडे फंड उपलब्ध नाही असे सांगितले जात आहे", अशी माहिती लातूर येथील विधी निदेशक गोपीनाथ पाटिल यांनी दिली आहे.
यातील महिला विधी निदेशक आर्थिक स्थिति बिकट झाले आहे. कोर्ट प्रकरण पेक्षा त्यांनी इकडे अधिक लक्ष दिले. 2006 पासून याच ठिकाणी करार नुसार का असेना कामे केली आहेत. यात कैंसर ग्रस्त महिला विधि निदेशक संजीवनी वेल्हाळ कार्यरत आहेत. अविवाहित असलेल्या संजीवनी यांच्या आई वडिलांचे ही निधन झाले आहे. आता काम बंद झाले आहे ..ते सुरु होण्याची शाश्वती नाही. पगार बाकी आहे असा दुहेरी मार त्यांना बसतोय. राज्यातील 70 विधि निदेशक पैकी 40 महिला विधि निदेशक आहेत. त्यांची ही अवस्था कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्र सांगली येथे विधि निदेशक पदावर कार्यरत असलेल्या शुभांगी जाधव यांनी एबीपी माझाला ही माहिती दिलो आहे.
हे देखील वाचा-
- Ahmednagar News : धान्य न घेणाऱ्यांचे रेशनकार्ड रद्द करणार, पुरवठा विभागाची मोहीम
- CM Uddhav Thackeray : "देशात सर्वात कमी मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात, राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका"
- IPS पासून कॉन्स्टेबलपर्यंत, बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार, शिवसेना आमदारानं सभागृहातच सांगितलं!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha