कुणबी नोंदी आढळल्या म्हणून तुम्ही मागास कसे? लक्ष्मण हाकेंचा सवाल, म्हणाले, आत्तापर्यंत वाटप झालेली कुणबी प्रमाणपत्र बोगस
मनोज जरांगेंना (Laxman Hake) आरक्षणतील किती कळतं? ज्या जातींचा ओबीसीत समावेश केला जातोय त्या उपजाती आहेत, असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hak) यांनी जरांगेंवर टीका केली.
Laxman Hake : मनोज जरांगेंना (Laxman Hake) आरक्षणतील किती कळतं? ज्या जातींचा ओबीसीत समावेश केला जातोय त्या उपजाती आहेत, असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hak) यांनी जरांगेंवर टीका केली. आत्तापर्यंत जी कुणबी प्रमाणपत्र वाटप झाली ती बोगस आणि बेकायदा असल्याचे हाके म्हणाले. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मंत्र्यांना अंतरवालीत बोलावून घ्या. मुंबईत दंगली घडवायला चालले आहात का? असा सवाल देखील हाकेंनी केला. जी जात मागे पडते तिला पुढे आणण्यासाठी आरक्षण दिले जाते. त्यात तुम्ही बसतच नाहीत असे हाके म्हणाले. कुणबी नोंदी आढळल्या म्हणून तुम्ही मागास कसे? असा सवाल हाकेंनी केला
ओबीसींची संघर्ष यात्रा निश्चित काढली जाणार
आरक्षणाच्या लढायची पुढील दिशा आणि स्वरूप ठरवण्यासाठी आजची बैठक असल्याचे हाके म्हणाले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही बैठक घेत आहोत. ओबीसींची संघर्ष यात्रा निश्चित काढली जाणार आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. कोणीतरी मुंबईला जात आहे आणि यंत्रणा वेठीस धरत आहे. मात्र आम्ही तसे करणार नाही अस हाके म्हणाले. आरक्षणातील जरांगेना किती कळतं? आरक्षणाचे अधिकार आयोगांना असतात. ज्या जातींचा ओबीसीत समावेश केला जातोय. त्या ओबीसीतील उपजाती आहेत असे हाके म्हणाले.
जी जात मागे पडते तिला पुढे आणण्यासाठी आरक्षण दिले जाते
ओबीसीत नव्याने जाती सामील केल्या आहेत, असं काही नाही त्यांना यातील कळत नाही. ज्यांना कळतं त्यांनी पुढे यावं असे हाके म्हणाले. आरक्षण कुणालाही दिलं जातं नाही. जी जात मागे पडते तिला पुढे आणण्यासाठी आरक्षण दिले जाते, त्यात तुम्ही बसतच नाहीत असे हाके म्हणाले. आत्तापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले ते बोगस बेकायदा असल्याचे हाके म्हणाले. कुणबी नोंदी आढळल्या म्हणून तुम्ही मागास कसे? असा सवाल हाकेंनी केला
आता लढत ओबीसी विरुद्ध कुणबी अशी नाही, तर बोगस कुणबी विरुद्ध कुणबी अशी होणार
कुणबीचा आधार घेऊन कोणीही घुसखोरी करत असेल तर ओबीसींचे आरक्षण संपण्याचा हा प्रकार असल्याचे हाके म्हणाले. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तुम्ही मंत्र्यांना अंतरवालीत बोलून घ्या. मुंबईत दंगली घडवायला चालले आहात का? असा सवाल हाकेंनी मनोज जरांगेंना केला. मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं हा त्यांचा अजेंडा आहे. आता लढत ओबीसी विरुद्ध कुणबी अशी होणार नाही. तर बोगस कुणबी विरुद्ध कुणबी अशी होणार आहे. जे घडत आहे. ते बेकायदा घडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निवाडा दिला त्याच उल्लंघन तुम्ही करत आहात असे हाके म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:


















