एक्स्प्लोर

Laxman Hake : मनोज जरांगेंना एका काडीचा देखील अभ्यास नाही, बुद्धीभेद करू नका, माहिती घेऊन बोलत जा; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

Laxman Hake on Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना एक काडीचा देखील अभ्यास नाही. थोडा अभ्यास आणि थोडीशी माहिती घेऊन त्यांनी बोलले पाहिजे. अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे यांच्यावर केली आहे.

जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नेमकी काय मागणी करतात, हे अजून मला कळालेले नाही. कारण प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. तसेच अतिरिक्त कधीच होणार नाही अशाच गोष्टीची ते मागणी करतात. त्यांचे कोण सल्लागार आहेत हे कळत नाही. त्यांनी थोडा अभ्यास आणि थोडीशी माहिती घेऊन बोलत जा म्हणावं. मनोज जरांगेंना एक काडीचा देखील अभ्यास नाही. अशी बोचरी टीका लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake)मनोज जरांगे पाटील यांचावर केली आहे.

एसटीची लढाई आमची वेगळी आहे. एसटीची आमची लढाई चालू असताना आमच्या ताटातलं आरक्षण हिरावून घेतलं जात असेल तर आमचे छोटे-छोटे समाज पुढे येणार आहेत का? आमच्या धनगर समाजाचे सर्व नेते आणि आमच्यामध्ये सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे बुद्धीभेद करू नका थोडीशी माहिती घेऊन बोलत जा, असा सल्लाही लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटील यांना दिला आहे. 

निवेदनकर्त्या माणसाला काळ फासणे म्हणजे ही झुंडशही

डॉ. रमेश तारक  सारख्या उच्चशिक्षित माणसाच्या तोंडाला काळ पासण अजिबात योग्य नाही. मात्र त्यांच्यात स्थानिक स्थरावर काय इशू आहेत, त्यांच्या कमिटीच्या लोकांबद्दलचे काय प्रकरण आहेत, तसेच  त्याच्या पाठीमागे खूप काही गोष्टी घडत असणाऱ्या शासनाने यामध्ये लक्ष घालावे. गृह विभागानेही यामध्ये लक्ष घालावे. आज तोंडाला काळ फासले, उद्या काही अनुचित प्रकार घडू नये. आताची त्यांची वाटचाल त्यांच्यामध्ये घुसमट सुरू असल्याचे दाखवते. म्हणून तेव्हाच अशा घटना घडत आहेत. कायदा हातात घेऊन निवेदनकर्त्या माणसाला काळ फासले जात असेल तर ती झुंडशही आहे. कायद्याचा आवाज बांधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी यावेळी बोलतांना दिली. 

आंदोलनांना गालबोट लावायचे काम चांगलं नाही- लक्ष्मण हाके

डॉ. रमेश तारक यांना  काळे फसले ते पाहून मला फार वाईट वाटले. आंदोलनांना गालबोट लावायचे काम चांगलं नाही, मी अशा काड्या करत नाही. डॉक्टरला माहिती आहे त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल तर ते  आम्ही सोडून दिल आहे. समाजाला त्रास होईल असे पाऊल उचलायचे नाही. माझ्या आजूबाजूला माझ्या महाराष्ट्रातील जनता आहे. ते आंदोलक आजूबाजूला होते तर कुणाचं काय सांगता येतं. कुणावर विश्वास ठेवावा,  असेही लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Banger : हिंगोलीच्या कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांचं शक्ती प्रदर्शनSolapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलंNitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात NagpurBhaskar Jadhav on Eknath Shinde : शिंदेंचा सवाल, भास्कर जाधव म्हणाले... नक्कल करायला अक्कल लागते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Embed widget