Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या जाण्याने जागतिक पातळीवर हळहळ, 43 देशात अंत्ययात्रेचे लाईव्ह सुरू
Lata Mangeshkar : पाकिस्तानातील सर्व चॅनेल्ससह जागतिक पातळीवरील 43 देशात लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेचे लाईव्ह सुरू आहे.
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज (6 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय गानकोकिळेच्या जाण्याने जागतिक पातळीवरदेखील हळहळ व्यक्त केली जात आहे. जागतिक पातळीवरील 43 देशात लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेचे लाईव्ह सुरू आहे.
लता मंगेशकरांवर सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्कातील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंतिमविधी शिवाजी पार्क स्माशानभूमी येथे होणार आहे. लता मंगेशकर यांच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित राहणार आहेत. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर
केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत यासंदर्बात माहिती दिली आहे.
भारतरत्नसह विविध पुरस्कारांनी सन्मान
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनाने राजकीय क्षेत्रातही शोककळा, नेत्यांकडून दीदींना आदरांजली
Lata Mangeshkar death : 'ऐ मेरे वतन के लोगो'... ज्या दिवशी कवी प्रदीप यांचा जन्म झाला त्याच दिवशी लतादीदींनी घेतला अखेरचा श्वास
Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकरांच्या निधनाने अवघ्या संगीतविश्वावर शोककळा, दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha