एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बनावट दागिने तारण ठेवून लाखोंचं कर्ज, कोल्हापुरातील टोळीचा पर्दाफाश
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बँका पतसंस्था आणि सराफ व्यावसायिक यांच्याकडे बनावट सोने तारण ठेवून फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित बँका, पतसंस्था आणि सराफ व्यावसायिकांकडे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करवीर पोलिसांनी या टोळीतील नऊ जणांना अटक केली असून एक जण पसार झाला आहे. या टोळीकडून दोन किलो सोन्याचे बनावट दागिने जप्त केले असून प्राथमिक तपासात 39 लाख 32 हजारांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बँका पतसंस्था आणि सराफ व्यावसायिक यांच्याकडे बनावट सोने तारण ठेवून फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी चौकशी सुरु केली. या चौकशीच्या आधारे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, आयसीआयसीआय बँक, वीरशैव बँक, दर्शन सहकारी पतसंस्था, भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स, शंकर गणपतराव शेळके ज्वेलर्स, महालक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडे असणाऱ्या सोन्याची तपासणी सुरु केली. यावेळी त्यांना दोन किलो नऊ तोळे बनावट सोनं आढळले.
या बनावट सोन्याच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांनी 39 लाख 32 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी टोळी प्रमुख चंद्रकांत शिवराम भिंगार्डे याच्यासह नऊ जणांना अटक केली आहे.या टोळीमध्ये दोन महिलांचा समावेश असून एक महिला सातारा जिल्ह्यातील कोरेगावची रहिवासी आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या टोळीने दोन किलो नऊ तोळे बनावट सोन्याच्या 31 चैन, 3 अंगठ्या आणि 2 कानातले पोलिसांनी जप्त केले आहेत. बनावट सोन्याच्या दागिन्यांमध्ये अन्य धातूचा वापर करुन, त्यावर जाडसर असा सोन्याचा मुलामा देऊन, ते तारण ठेवल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आणखी काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे खालील प्रमाणे
1. टोळी प्रमुख- चंद्रकांत शिवराम भिंगार्डे वय- 55 (राहणार फुलेवाडी कोल्हापूर)
2. अतुल निवृत्ती माने ( वय-29, राहणार- गणेशवाडी, तालुका-करवीर, जिल्हा कोल्हापूर)
3. विलास अर्जुन यादव (वय 45, राहणार- गणेशवाडी, तालुका-करवीर, जिल्हा कोल्हापूर)
4. अमर दिनकर पाटील (वय- 28 राहणार- गणेशवाडी, तालुका-करवीर, जिल्हा कोल्हापूर)
5. भारती श्रीकांत जाधव (पाचगाव तालुका-करवीर, जिल्हा-कोल्हापूर)
6. कविता आनंदराव राक्षे (वय- 38 राहणार -सुभाष नगर, कोरेगाव जिल्हा- सातारा)
7. विक्रम मधुकर कोईगडे (वय-30 राहणार- शिरोली दुमाला तालुका- करवीर, जिल्हा - कोल्हापूर)
8. राकेश रजनीकांत रणदिवे (वय- 41 राहणार- गंगावेश, जिल्हा-कोल्हापूर )
9. पृथ्वीराज प्रकाश गवळी (वय- 28 राहणार- शिंगनापूर तालुका-करवीर, जिल्हा-कोल्हापूर)
पसार आरोपी
10. तानाजी केरबा माने (वय-46, राहणार -गणेश वाडी, तालुका-करवीर, जिल्हा-कोल्हापूर)
या बँका, पतसंस्था आणि सराफ व्यावसायिकांची फसवणूक
1. जिल्हा मध्यवर्ती बँक, कोल्हापूर शाखा, शिरोली दुमाला आणि कसबा बीड, फसवणूक - 5 लाख 44 हजार 500 रुपये
2. आयसीआयसीआय बँक, शाखा कोतोली बाजार भोगाव घोटवडे, फसवणूक - 14 लाख 43 हजार 462 रुपये
3. वीरशैव बँक, शाखा सानेगुरुजी वसाहत आणि राशिवडे, फसवणूक - 4 लाख 7 हजार रुपये
4. राजे विक्रमसिंह घाटगे बँक, शाखा बाचणी, फसवणूक - 6 लाख रुपये
5. दर्शन सहकारी पतसंस्था महाराणा प्रताप चौक कोल्हापूर फसवणूक सात लाख 67 हजार रुपये
6.भाग्य लक्ष्मी ज्वेलर्स पाचगाव फसवणूक एक लाख 40 हजार रुपये
7. शंकर गणपतराव शेळके ज्वेलर्स, माळ्याची शिरोली, फसवणूक - 12 हजार रुपये
8. महालक्ष्मी ज्वेलर्स, बालिंगा, फसवणूक 18 हजार रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement