मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकूण किती अर्ज आले, जालन्यातून सर्वाधिक अर्ज रिजेक्ट, जाणून घ्या A टू Z डेटा
राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसीठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.
Ladki bahin Yojna : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यानंतर महिलांना निधी मिळण्यासाठी सुरुवात झाली आहे. आतापर्यंत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत माध्यम आराखडा राबविण्यास (Media Plan) व त्याकरिता होणा-या रुपये 199 कोटी 81 लाख 47 हजार 436 रुपयांच्या खर्चास शासन मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान मराठवाड्यात लाडक्या बहीण योजनसाठी आठ जिल्ह्यातून 26 लाख 24 हजार 423 अर्ज प्राप्त झाले आहेत.
या योजनेला यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर देखील प्रयत्न करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून 17 ऑगस्टला पुण्यात लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसीठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.
मराठवाड्यातून 26 लाखाहून अधिक अर्ज
मराठवाड्यातून लाडकी बहीण योजनेसाठी 26 लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. त्यातील 25 लाख 33 हजार 820 अर्जांना मंजुरी देण्यात आली असून, एकूण 53 हजार 681 नामंजूर करण्यात आले. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून म्हणजे सर्वाधिक म्हणजेच 8 हजार 900 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज?
5 लाख 41 हजार 754 अर्ज
5 लाख 34 हजार 310 मंजूर
4 हजार 102 अर्ज नामंजूर
मंजूर टक्केवारी 98.63
हिंगोली :
1 लाख 79 हजार 205 अर्ज
1 लाख 76 हजार 928 मंजूर
1 हजार 652 अर्ज नामंजूर
मंजूर टक्केवारी 98.73
धाराशिव :
1 लाख 89 हजार 911 अर्ज
1 लाख 74 हजार 968 मंजूर
नामंजूर तपासणे बाकी
मंजूर टक्केवारी 97.009
लातूर :
3 लाख 40 हजार 10 अर्ज
3 लाख 2 हजार 980 मंजूर
8 हजार 808 अर्ज नामंजूर
मंजूर टक्केवारी 96.84
बीड :
3 लाख 52 हजार 668 अर्ज
3 लाख 41 हजार 428 मंजूर
4 हजार 352 अर्ज नामंजूर
मंजूर टक्केवारी 96.81
नांदेड :
4 लाख 73 हजार 01 अर्ज
4 लाख 57 हजार 866 मंजूर
862 अर्ज नामंजूर
मंजूर टक्केवारी 96.80
परभणी :
2 लाख 57 हजार 293 अर्ज
4 लाख 48 हजार 901 मंजूर
5 हजार 05 अर्ज नामंजूर
मंजूर टक्केवारी 96.74
जालना
3 लाख 581 अर्ज
2 लाख 70 हजार 439 मंजूर
28 हजार 900 अर्ज नामंजूर
मंजूर टक्केवारी 89.97
राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना
राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेद्वारे ज्या महिलांच्या कुटुंबांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. महिलांना या योजनेतून एका वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत.
हेही वाचा: