एक्स्प्लोर

कृष्णा आणि कोयनेचं पाणी दुष्काळी भागांना वळवता येणार नाही, राज्य सरकारचं स्पष्टीकरण

भाजप सरकारच्या या निर्णयामुळे आता इतर पक्षातून भाजपत आलेले खासदार, आमदार आता संभ्रमात पडले आहेत. कारण विजयसिंह मोहिते पाटील यांसारखे नेते ‘कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प’मुळे भाजपत सामील झाले होते.

उस्मानाबाद : कृष्णा आणि कोयना या नद्यांमधील पाणी दुष्काळी भागासाठी वळवता येणार नसल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. त्यामुळे कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना आता बासनात गुंडाळावी लागणार आहे. तसेच पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद आणि बीड या सहा जिल्ह्यांना कृष्णा आणि कोयनेतून पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना महाजन यांनी ही माहिती दिली. भाजप सरकारच्या या निर्णयामुळे आता इतर पक्षातून भाजपत आलेले खासदार, आमदार आता संभ्रमात पडले आहेत. कारण विजयसिंह मोहिते पाटील यांसारखे नेते ‘कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प’मुळे भाजपत सामील झाले होते. त्यामुळे आता त्यांची दुष्काळी भागातील जनतेसाठी पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कृष्णेतले अतिरिक्त पाणी माण आणि भीमा खोऱ्यात वळवून राज्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये सिंचनासाठी वळवेले जाणार होते. पण कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प कृष्णा पाणीतंटा लवादाने केलेल्या मनाईमुळे राबविता येणार नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी सांगितले. VIDEO | कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना बासनात गुंडाळणार | ABP Majha कृष्णा पाणी तंटा लवादाने एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात पाणी वळवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प राबविता येत नसल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. भीमा आणि माण नदी खोऱ्यात पाण्याची कमतरता असते. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या खोऱ्यात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी असते. हे अतिरिक्त पाणी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वाहून जाते. ते पाणी भीमा नदीच्या खोऱ्यात आणण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या प्रकल्पाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. कृष्णा आणि कोयनेतील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला फेब्रुवारी 2004 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या योजनेमुळे पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांतील पाच लाख 50 हजार 290 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget