एक्स्प्लोर

मोठी बातमी : राज्यभरातील 42 हजार कंत्राटी वीज कर्मचारी संपावर, मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु

Nagpur News : नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

Electricity Workers Strike  : राज्यभरातील 42 हजार कंत्राटी वीज कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या नेतृत्वात हा बेमुदत संप पुकारण्यात आला असून राज्यातील महावितरण (Mahavitaran), महानिर्मिती (Mahanirmiti) आणि महापारेषणचे (Mahapareshan) कंत्राटी कर्मचारी (Contract Workers) संपात (Strike) सामील झाले आहेत. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे 42 हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. 

राज्यातील 42 हजार कंत्राटी वीज कर्मचारीसंपावर

नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रीतील कंत्राटी वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरिता मध्य रात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु

चंद्रपुरातही कंत्राटी वीज कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेला आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निर्मिती केंद्राच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. राज्यातील सुमारे 42 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नये आणि 30 टक्के वेतनवाढ देण्यात यावी या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. 

सुमारे 42 कंत्राटी कर्मचारी संपावर

महावितरण (Mahavitaran), महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये राज्यातील सुमारे 42 हजार कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, यासह इतरही मागण्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत. त्या मान्य होत नसल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 28 आणि 29 फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता आणि त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. त्यानुसार, आता कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलन पुकारलं आहे.

मागण्या मान्य न झाल्याने काम बंद आंदोलन

नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात (Koradi Thermal Plant Workers Strike)  660 मेगावॅटचे एकूण तीन संच आहे. येथे रोज 1960 मेगावॅट विजेची निर्मिती होते. या संपात येथील सहा हजार कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले असल्याने पुढील काळात येथील वीज निर्मितीवर याचा परिणाम होण्याच्या शक्यता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tata Power Company: एप्रिलनंतर वीज दरवाढीचा शॉक; घरगुती वीजदर वाढण्याची शक्यता, छोट्या घरगुती ग्राहकांवर मोठा भार

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget