एक्स्प्लोर
Advertisement
कोकण रेल्वेत माजी आमदाराचं सामान चोरीला, मुद्देमालासह बंदुकही लंपास
मुंबई/रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्या सामानावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. वातानुकूलित बोगीमधून प्रवास करणाऱ्या बाळ माने यांच्या सामानाची चोरी झाली आहे.
भाजपचे माजी आमदार बाळ माने मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. यावेळी चोरट्यांनी त्यांचं सामान लंपास केलं. यात एक लाखांपेक्षा जास्त मुद्देमालासह बंदुकही चोरीला गेली आहे.
सध्या रेल्वेचा प्रवास हा विविध गोष्टींमुळे असुरक्षित बनत चालला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणवर वाढलं आहे. याला आता राजकारणीही अपवाद उरलेले नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यानच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वे मंत्री झाल्यापासून त्यांनी रेल्वेमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. परंतु तरीही रेल्वेमधील सुरक्षितता हे त्यांच्यासमोरील फार मोठे आव्हान असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
नाशिक
बातम्या
Advertisement