एक्स्प्लोर
दक्षिण कोकणची काशी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात
दक्षिण कोकणची काशी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या यात्रेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.
सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेला उद्या 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यात्रेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याने या यात्रेकडे राज्याचं लक्ष लागून राहील आहे. मुख्यमंत्री स्वतः येत असल्यामुळे आंगणे ग्रामस्थांसह जिल्हा प्रशासनाकडून यात्रोत्सव सुरळीत होण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
मालवण तालुक्यातील आंगणेवाडी भराडीदेवीची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून आंगणेवाडीच्या भराडी देवीची ख्याती आहे. देवीने कौल दिल्यानंतर 17 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी पारध -
यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतात यावर्षी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सुमारे अर्धा डझन मंत्र्यांसह यात्रेला हजेरी लावणार आहेत. साहाजिकच यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. यात्रेसाठी सुमार पाचशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच चाळीस सीसीटीव्ही कॅमेराची नजर मंदीर परीसरात असणार आहे. दरवर्षी प्रमाणे भाविकांसाठी नऊ रंlगाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री येणार असले तरी भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. आंगणेवाडी यात्रे निमित्ताने महाराष्ट्राचे तीसरे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सोबतच अर्ध मंत्रीमंडळही असणार आहे. ते सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आढाव्यासोबतच संपुर्ण कोकणाच्या विकासाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याचा कोकणाला काय फलित मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकार तुम्ही चालवा पण, कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा -
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे इथे दाखल होणार आहेत. गणपतीपुळेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला श्रींचे दर्शन घेणार आहेत, त्यानंतर विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजुर झालेल्या सुमारे 102 कोटींच्या विकासकामांमधील प्रमुख कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच गणपतीपुळे येथील आठवडाबाजार मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.
Konkan Railway | कोकण रेल्वेवर विद्युत इंजिनाची चाचणी यशस्वी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement